शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चॅट जीपीटीला सांगितलं पैशांचा जुगाड कर, एका मिनिटांत खात्यात जमा झाली एवढी रक्कम, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 20:19 IST

Chat GPT : चॅट जीपीटीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे. आता चॅट जीपीटी लोकांचे  पैसे परत मिळवून देण्यास मदत करू लागले आहे.

चॅट जीपीटीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे. आता चॅट जीपीटी लोकांचे  पैसे परत मिळवून देण्यास मदत करू लागले आहे. DoNotPay चे सीईओ, जोशुआ ब्राउडर यांनी सांगितले की, त्यांनी चॅट जीपीटीला आपले हरवलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करण्यास सांगितले. काही वेळानंतर त्यांच्या खात्यामध्ये २१० डॉलर म्हणजेच सुमारे १७ हजार २०० रुपये जमा झाले. त्यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती देताना सांगितले की, मी नव्या चॅट जीपीटी बाउझिंग एक्स्टेंशनच्या माध्यमातून माझ्यासाठी काही पैसे शोधण्यास सांगितले. त्यानंतर एका मिनिटाच्या आत कॅलिफोर्निया सरकारकडून माझ्या खात्यामध्ये २१० डॉलर जमा झाले. मात्र हा दावा खराच आहे का, याला कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. 

ब्राउडर यांनी सांगितले की, सर्वप्रथम चॅट जीपीटीने त्यांना कॅलिफोर्निया स्टेट कंट्रोलर वेबसाईटवर जाण्याचा सल्ला दिला. या वेबसाईटवर अनक्लेम फंड्सची माहिती पुरवली जाते. उदाहरणार्थ जर कुठली कंपनी तु्म्हाला रिफंड करू इच्छित असेल मात्र तुमच्याशी संपर्क होत नसेल तर या वेबसाईटकडे हा फंड उपलब्ध असतो. चॅट जीपीटीने ब्राऊडर यांना ते कशाप्रकारे या पैशांवर दावा करू शकतात. याबाबत माहिती दिली.

ब्राऊडर यांनी सांगितले की, चॅट जीपीटीने जे सांगितले, तसे त्यांनी केले. त्यानंतर एका मिनिटाच्या आत त्यांच्या खात्यामध्ये २०९.६७ रुपये ट्रान्सफर झाले. DoNotPay च्या सीईओंनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टप्प्याला स्वत:ही पूर्ण करू शकतात. मात्र, असं इंटिग्रेशन केल्याने कंपन्यांचं नुकसान होईल. त्यांनी सांगितले की, चॅटजीपीटीला ही प्रक्रिया पूर्ण करण्यापासून केवळ एक कॅप्चाच थांबवू शकतो.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय