शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Titanic submarine Missing टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या पाचही अब्जाधीशांचा मृत्यू, टायटन सबमरीन अखेर सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 08:08 IST

Titanic submarine is finally found with all five people dead after being spotted on the wreck of the Titanic पाणबुडी चालवणारी कंपनी ओशनगेटने श्रद्धांजली वाहत या वृत्ताला दुजोरा दिला

Titan Submarine: टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन पाणबुडीतील (Titanic submarine) पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी व त्या जागेला भेट देण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा भयंकर स्फोट झाला, ज्यात पाणबुडीतील सर्वांचा मृत्यू झाला असे यूएस कोस्ट गार्ड रिअर ऍडमी. जॉन मॅगर यांनी सांगितले. याला दुजोरा देत पाणबुडी चालवणारी कंपनी ओशनगेटने श्रद्धांजली वाहिली आहे. पाणबुडीतील सर्व लोक बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात गेले, तिथे त्यांचा संपर्क तुटला. १८ जून रोजी ओशनगेट कंपनीची ही पाणबुडी प्रवासाला निघाली होती, मात्र पहिल्या 2 तासातच संपर्क तुटला होता. टायटन पाणबुडीत बसलेले पाचही लोक सुप्रसिद्ध अब्जाधीश होते. त्यात ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश, प्रिन्स दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि पॉल-हेन्री नार्गिओलेट यांचा समावेश होता.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शोध पथकाला टायटॅनिक जहाजाजवळ हरवलेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. यूएस कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार पाणबुडीचे अवशेष सापडल्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. कॅनडाच्या एका जहाजात बसलेल्या मानवरहित रोबोटने पाणबुडीचे अवशेष शोधून काढल्याचे सांगण्यात येत आहे.18 जून रोजी अमेरिकन कंपनी ओशनगेटची ही पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी प्रवासाला निघाली. टायटॅनिकचा टूर या भग्नावस्थेपर्यंत पोहोचणे, तिथे फिरणे आणि नंतर परत येणे हे सुमारे आठ तास चालते. टायटॅनिकच्या ढिगाऱ्याजवळ जायला दोन तास लागतात. चार तास पाणबुडी भग्नावस्थेचा परिसर दाखवते. त्यानंतर परतायलाही सुमारे दोन तास लागतात. शोध मोहिमेत खूप अडचणी आल्या.

अचानक बेपत्ता झालेली ही पाणबुडी शोधणे सोपे नव्हते. अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, हे एक अतिशय कठीण बचाव कार्य आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, या शोध मोहिमेत शोध पथकाला सर्वात मोठी समस्या भेडसावत होती ती म्हणजे पाण्यातील दृश्यमानता. वास्तविक, प्रकाश पाण्याच्या खाली फारसा जात नाही, तर पाणबुडी जवळपास ३ किलोमीटर खाली होती, अशा स्थितीत शोध पथकाला स्पष्ट दिसण्यात खूप त्रास होत होता.

पोहोचण्याच्या काही वेळापूर्वीच संपर्क तुटला. समुद्राच्या 12,500 फूट खोलीत टायटॅनिकचे भग्नावशेष पाहण्यासाठी आठ तास लागतात, तिथे फिरून परत येतात. जायला दोन तास लागतात. चार तास पाणबुडी टायटनच्या भंगारभोवती फिरते. त्यानंतर पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. अशा स्थितीत टायटन १८ जून रोजी प्रवासाला निघाले तेव्हा सुमारे दीड ते दोन तासांनंतर त्याचा नियंत्रण यंत्रणेशी संपर्क तुटला. म्हणजेच ज्या वेळी पाणबुडीचा संपर्क तुटला, त्या वेळी ती ढिगाऱ्याजवळ पोहोचणार होती. मात्र त्यापूर्वीच ती अचानक बेपत्ता झाली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपर्क तुटल्यानंतर सुमारे आठ तासांनी अमेरिकेच्या तटरक्षक दलाला अलर्ट मिळाला. अलर्ट मिळताच अमेरिकेच्या तटरक्षक दलाने शोध मोहीम सुरू केली. यूएस कोस्ट गार्डच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की हे बचाव कार्य अतिशय गुंतागुंतीचे होते.

टॅग्स :Americaअमेरिका