शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलं नवीन काम, लवकरच दिसणार 'या' अवतारात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 18:29 IST

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना रेसलिंग आणि बॉक्सिंगची प्रंचड आवड आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नवीन छंद जोपासला आहे. ट्रम्प आता बॉक्सिंग सामन्यात कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. या सामन्यात माजी हेवीवेट चॅम्पियन इव्हँडर होलीफील्डचा सहभाग असेल. ट्रम्प यांच्यासोबत त्यांचा मुलगा डोनाल्ड जूनियरदेखील असेल. हॉलीवूडमध्ये होणाऱ्या या सामन्याचे लाइव्ह फीड FITI.TV वर उपलब्ध होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे खेळावरील प्रेम जगजाहीर आहे. खेळामध्ये विशेषतः बॉक्सींग आणि रेसलिंग त्यांना प्रचंड आवडते. यापूर्वीही त्यांना वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंट म्हणजे WWE मध्ये पाहिले गेले आहे. त्या ठिकाणी त्यांनी कॉमेंट्री केली होती. आता परत एकदा ते बॉक्सिंग सामन्यात कॉमेंट्री करण्यास सज्ज झाले आहेत.

याबाबत सांगताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'मला नेहमीच महान खेळाडू आणि खेळाविषयी विशेष आकर्षण आहे. मी शनिवारी रात्री अशाच एका सामन्याचा भाग होतोय. त्या ठिकाणी मी कॉमेंट्री करेन. हा सामना तुम्ही चुकवू नका.' दरम्यान, सामना आधी लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर दे ला होया आणि व्हिटर बेलफोर्टदरम्यान होता. पण, डे ला होयाला कोरोनाची लागण झाल्यानंतर ऐनवेळी होलीफील्डला संधी देण्यात आली. होलीफील्डच्या वयाचा हवाला देत कॅलिफोर्निया राज्य एथलेटिक आयोगाने सामन्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे आता हा सामना फ्लोरिडामध्ये होईल. होलीफील्ड पुढच्या महिन्यात 59 वर्षांचे होणार आहेत. 2011 पासून त्यांनी एकही सामना खेळलेला नाही.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाboxingबॉक्सिंगWrestlingकुस्ती