शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Video : टेक ऑफच्या वेळी ‘रन वे’वर झाला मोठा अपघात, क्षणार्धातच विमानानं घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 09:30 IST

चीनच्या चोंगकिंग येथे गुरूवारी विमानाचा मोठा अपघात झाला. तिबेट एअरलाईन्सचं विमान टेक ऑफच्या दरम्यान रनवे वरुन घसरलं.

चीनच्या चोंगकिंग (Chongqing) मध्ये गुरूवारी मोठा अपघात झाला. विमानतळावर तिबेट एअरलाईन्सचं विमान टेक ऑफ दरम्यान रन वे वरून घसरलं. यानंतर क्षणार्धातच या विमानाला आग लागली. या विमानात ११३ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर प्रवास करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अपघातात काही जण जखमी झाले असल्याची माहिती सरकारी माध्यमाकडून देण्यात आली. सीसीटीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार चोंगकिंगहून न्यांगची येथे जाणाऱ्या विमानात चोंगकिंग जियांगबेई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आग लागली.या विमानातील सर्व ११३ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती पीपल्स डेलीनं विमान कंपनीच्या हवाल्यानं दिली आहे. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना त्वारित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला असून विमानाला आग लागल्याचं यात स्पष्टपणे दिसत आहे. तसंच ही आग विझवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचं यात दिसून येत आहे. ज्यावेळी विमान चोंगकिंग येथून न्यांगची येथे जात होते तेव्हा क्रूला संशय आणि त्यांनी विमान पुन्हा खाली उतरलवलं. यानंतर विमानाला आग लागल्याचं दिसल्याचं विमान कंपनीनं सांगितलं. सर्व प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. जे प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही तिबेट एअरलाईन्सनं दिली. 

दोन महिन्यांपूर्वी मोठा अपघातदोन महिन्यांपूर्वीही चीनमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला होता. चीनच्या ईस्टर्न एअरलाईन्सच्या विमानाचा अपघात धाला होता. यामध्ये १३२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या विमानात एकूण १२३ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर्स होते.

टॅग्स :chinaचीनAirportविमानतळ