शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीला झाला कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 16:29 IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. शरीफ यांच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. शरीफ यांच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. कुलसुम नवाज यांना गळ्याचा कॅन्सर झाल्याची माहिती आहे.  

लाहोर, दि. 23 - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. शरीफ यांच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. कुलसुम नवाज यांना गळ्याचा कॅन्सर झाल्याची माहिती आहे.  कुलसुम नवाज गेल्या आठवड्यात लंडनमध्ये मेडिकल टेस्ट करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांचा कॅन्सर  प्राथमिक टप्प्यात असतानाच निदान झाल्याने त्यावर उपचार करता येणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होणार आहेत. 28 जुलै रोजी नवाज शरीफ यांना पनामा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर कुलसुम यांनी पोटनिवडणुकांसाठी शरीफ यांच्या जागी अर्ज भरला होता.काय झालं नेमकं 28 जुलै रोजी- बहुचर्चित पनामागेटप्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. नवाज शरीफ यांना पंतप्रधान पदावरुनही हटवण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात राजकीय भूकंपच आला आहे. पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर नवाज शरीफ पंतप्रधानपदावरुन पायउतार झाले आहेत.पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी काही दिवसांपुर्वी संपली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला होता. यावेळी अनेक राजकीय विश्लेषकांनी न्यायालयाचा निर्णय नवाज शरीफ यांच्याविरोधात जाईल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे न्यायालयाने नवाज शरीफ यांच्याविरोधात निर्णय दिला असून त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आणली आहे. तीन सदस्यीय खंडपीठासमोर संपुर्ण सुनावणी पार पडली होती. न्यायाधीश एजाज अफजल यांच्या अध्यतेखालील खंडपीठात शेख अजमत सईद आणि इजाजूल एहसान यांचा समावेश होता. सुनावणी पुर्ण झाल्यानंतर निकालासाठी कोणतीही तारीख त्यांनी जाहीर करण्यात आली नव्हती. निकाल देत असताना कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं न्यायाधीस सईद यांनी यावेळी सांगितलं होतं. सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपास पथकाने सादर केलेल्या अंतिम अहवालावरही चर्चा करण्यात आली होती.  काय आहे पनामागेट प्रकरण?श्रीमंत व धनाढ्य नागरिक स्वत:ची संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे टॅक्स चोरतात? काय क्लुप्त्या लढवतात, यासंबंधीची माहिती अत्यंत गोपनीयतेने काम करणा-या पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण व गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने समोर आली होती. या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण , धनाढ्य व्यक्ती,उद्योगपती,  सेलिब्रिटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत ५०० भारतीयांचीही नावेदेखील आहेत. मोसेक फोन्सेका आपल्या ग्राहकांना काळा पैसा सफेद करण्यासाठी तसंच नियमांमधून वाचवण्यासाठी आणि करातून सूट मिळावी यासाठी कशा प्रकारे मदत करायची ही माहिती या कागदपत्रांमधून समोर आली होती. ही कागदपत्रे लीक झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांनीदेखील संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे पनामाची मदत घेतली ही माहिती समोर आली होती. एकीकडे जगभरातील इतकी मोठे नावे समोर आली असताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचं नावदेखील समोर आलं होते. ब्लादिमीर पुतिन यांनी जवळच्या मित्रांची मदत करण्यासाठी पनामाचा वापर केल्याची माहिती उघड झाली होती. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीचादेखील यामध्ये समावेश आहे.