रशियाच्या इव्हानोवो प्रांतात ९ डिसेंबर २०२५ रोजी एक भीषण विमान दुर्घटना घडली. रशियन हवाई दलाचे 'अँटोनोव्ह एन-२२' हे महाकाय लष्करी वाहतूक विमान चाचणी उड्डाणादरम्यान हवेतच कोसळले. या अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला असून, त्यामध्ये विमान जमिनीवर आदळण्यापूर्वीच हवेत त्याचे दोन तुकडे झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान नुकतेच दुरुस्ती होऊन परतले होते आणि त्याची चाचणी घेतली जात होती. इव्हानोवो येथील 'सरवेनी एअरफिल्ड'वरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान हवेत असतानाच त्याचे दोन भाग झाले आणि ते उवोदस्कोये जलाशयात जाऊन कोसळले.
७ अधिकाऱ्यांचा दुर्दैवी अंत या अपघातात विमानातील सर्व ७ क्रू सदस्यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये रशियन हवाई दलाचे काही वरिष्ठ अधिकारी आणि अनुभवी वैमानिक यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
जगातील सर्वात मोठे टर्बोप्रॉप विमान 'An-22' हे सोव्हिएत काळातील एक अत्यंत शक्तिशाली विमान मानले जाते. ६० टन वजनाचे सामान किंवा २९० सैनिकांना नेण्याची क्षमता असलेले हे जगातील सर्वात मोठे 'टर्बोप्रॉप' विमान आहे. रशियाने २०२४ मध्येच ही विमाने सेवेतून निवृत्त करण्याची योजना आखली होती, मात्र युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वापर सुरूच ठेवण्यात आला आहे.
Web Summary : A Russian An-22 military transport plane crashed in the Ivanovo region during a test flight on December 9, 2025, killing all seven crew members. The aircraft, recently repaired, broke apart mid-air before crashing into a reservoir. High-level investigation ordered.
Web Summary : 9 दिसंबर, 2025 को इवानोवो क्षेत्र में एक रूसी An-22 सैन्य परिवहन विमान परीक्षण उड़ान के दौरान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें सभी सात चालक दल के सदस्यों की मौत हो गई। हाल ही में मरम्मत किया गया विमान, जलाशय में दुर्घटनाग्रस्त होने से पहले हवा में ही टूट गया। उच्च स्तरीय जांच के आदेश दिए गए।