अस्ताना (कझागस्तान) : आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावरील (इंटरनॅशनल स्पेस सेंटर-आयएसएस) ११५ दिवसांचे वास्तव्य संपवून अमेरिका, जपान व रशियाचे अंतराळवीर रविवारी येथे सुखरूप परतले. अमेरिकेच्या केट रुबिन्स, रशियाचे अनातोली इव्हॅनिशीन आणि जपानचे ताकुया ओनिशी हे कझागस्तानच्या दक्षिणपूर्वेकडील झेजकागॅन गावात सोयुझ यानातून सुखरूप उतरले, असे रशियाच्या मिशन कंट्रोलने सांगितले.केट रुबिन्स व ओनिशी यांचा हा अंतराळातील पहिलाच प्रवास होता, तर फ्लाइट कमांडर इव्हॅनिशिन यांनी पाच वर्षांपूर्वी आयएसएस मोहिमेत भाग घेतला होता. आम्हा प्रत्येक जणाला खूपच छान वाटत असल्याचे इव्हॅनिशिन यांनी म्हटले. ते यानातून ते पहिल्यांदा बाहेर पडले.
तीन अंतराळवीर सुखरूप परतले
By admin | Updated: October 31, 2016 07:36 IST