शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांच्या हल्ल्यामुळे इराकचे स्थैर्य धोक्यात

By admin | Updated: June 13, 2014 21:51 IST

बंडखोरांच्या हल्ल्यामुळे

बंडखोरांच्या हल्ल्यामुळे
इराकचे स्थैर्य धोक्यात
बगदाद : इराकमध्ये सुन्नी बंडखोरांनी मोसूल शहरासह देशातील सुन्नीबहुल भागावर कब्जा करण्यासह राजधानी बगदादकडे आगेकूच सुरू केल्यामुळे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांच्या सरकारसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे बंडखोर वेगाने पुढे सरकत असताना सरकारला आतापर्यंत प्रत्युत्तरादाखल एकही ठोस कारवाई करता येऊ शकलेली नाही.
२०११ मध्ये अमेरिकी सैन्य परतल्यानंतर इराकच्या स्थैर्याला निर्माण झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका मानला जात आहे. यामुळे इराकची सुन्नी, शिया आणि कुर्द अशी फाळणी होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेवांटच्या बंडखोरांनी गुरुवारी इराकची राजधानी बगदादकडे कूच केले. सद्दाम हुसैन राजवटीचे अनेक समर्थक आणि इतर सुन्नी असंतुष्टही त्यांना येऊन मिळाले आहेत.
बंडखोरांनी इराकमधील दुसरे मोठे शहर मोसूलवर कब्जा केल्यानंतर तेथे शरिया कायदा लागू करण्याची घोषणाही केली. त्यांनी मंगळवारी मोसूलवर ताबा मिळवून इतर परिसराचीही नाकाबंदी केली होती.
सत्तेतील पोकळीचा लाभ उठवत उत्तर इराकमधील कुर्द सुरक्षा दलांनी किरकुक शहरातील हवाईतळ व इराकी लष्कराने सोडून दिलेल्या चौक्यांवर अंमल प्रस्थापित करणे सुरू केले आहे.
बगदादच्या उत्तरेकडील सुन्नीबहुल क्षेत्रातील विमानतळावरून तीन विमानांद्वारे अमेरिकी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जर्मनीने आपल्या नागरिकांना त्वरेने इराक सोडण्यास सांगितले आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की, इराकला त्यांच्या देशाकडून आणखी मदतीची आवश्यकता आहे; मात्र आपण इराकची कशाप्रकारे मदत करू इच्छितो हे त्यांनी स्पष्ट केले नाही. अमेरिका इराकमध्ये ड्रोन मोहीम चालविण्यावर विचार करत असल्याचे एका वरिष्ठ अमेरिकी अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या संकटावर बैठक घेतली. तिकडे अल मलिकी यांनी संसदेला देशात आणीबाणी लागू करण्यास सांगितले. आणीबाणीमुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला देश चालविण्यासाठी अतिरिक्त अधिकार प्राप्त होतील.