शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

या इटालियन मुलीला व्हायचंय मांजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2023 09:32 IST

चिआरा इथेच थांबायला तयार नाहीये. तिला आणखी शस्त्रक्रिया करून घ्यायच्या आहेत.

‘आय एम थिंकिंग आय विल बी अ प्रिटी कूल कॅट लेडी सून’- हे कुणाचं जीवनध्येय वैगेरे असू शकतं का? पण इटलीची चिआरा डेल इबेट हिला खरंच तसं  व्हायचंय ! ह्युमन कॅट ! म्हणजे मनुष्यजन्मातच मांजर! आणि त्यासाठी तिने तब्बल २२ शस्त्रक्रिया आणि शरीरावर एकूण ७२ ठिकाणी पिअर्सिंग करून - म्हणजे टोचून घेऊन आपला एकूण हुलिया पालटवण्याची धडपडसुद्धा करून झाली आहे. अलीकडेच या ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’चा एक व्हिडीओ तिने टिकटॉकवर टाकला आणि तो पाहता- पाहता व्हायरल झाला म्हणून जगाला तिच्या या विचित्र वेडाबद्दल कळलं तरी! 

या चिआराचं  सोशल मीडियावरचं नाव आहे आयडीन मोड! वयाच्या अकराव्या वर्षी हे मनुष्यजन्मीच मांजर होण्याचं (म्हणजे खरंतर मांजरासारखं दिसण्याचं) वेड तिच्या डोक्यात शिरलं असं ती  म्हणते. गेल्या दहा वर्षांत तिने आपल्या शरीरात शस्त्रक्रियांनी बदल घडवून अनुपालन हे विचित्र स्वप्न पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. तर तिने आतापर्यंत काय- काय केलं असावं ? दोन्ही नाकपुड्यांना  मधोमध छेद देऊन घेतले आहेत, दोन्ही ओठांचा आकार सिलिकॉन इम्प्लांटने वाढवून ते टोचून घेतले आहेत, जिभेला मधोमध छेद दिला आहे, ब्लेफेरोप्लास्टी नावाच्या शस्त्रक्रियेद्वारे आजूबाजूच्या भागाखालचा मेद काढून टाकून पापण्यांच्या आकारात बदल केला आहे.

डोळ्याच्या आजूबाजूच्या त्वचेवर बऱ्याच प्रक्रिया करून एकुणातच आपले डोळे मांजरीसारखे दिसतील असं काही तरी केलं आहे. एवढंच नव्हे, मांजरीला डोक्यावर दोनही बाजूला कान असतात, तसं काही तरी आपल्याही डोक्यावर असावं (म्हणजे दिसावं) म्हणून तिने डाव्या आणि उजव्या बाजूला टेंगळं करून घेतली आहेत (हे कसं केलं याचा तपशील मात्र उपलब्ध नाही)! आता एवढं केलंय म्हटल्यावर हातापायाची नखं मांजरीसारखी वाढवली असणार हे तर उघडच आहे, ते तिने केलंच आहे! शिवाय दोन्ही गालांवर गोंदवून घेऊन मांजरीला असतात तसे केस आणि मिशा काढून घेणं तर तसं सोपंच; तेही तिने अर्थातच केलं आहे! 

बाकी कुणाला हे खूळ वाटेल, मूर्खपणा वाटेल; पण चिआरा मात्र तिला जे काही करायचंय त्यावर ठाम आहे. ती सांगते, ‘मला लहानपणापासूनच मांजरं खूप आवडतात. मला माझं रंगरूप बदलून काही तरी वेगळं करायचं होतं. मग विचार केला तेव्हा वाटलं, कुठलं तरी कार्टून होण्यापेक्षा आपल्याला आवडतं ते मांजरच का होऊ नये? म्हणून मग मी हे प्रयत्न सुरू केले. माझ्या शरीरात शक्य होतील तेवढे बदल करून घेण्याची माझी जिद्द आहे. आता आधुनिक तंत्र माझ्या किती मदतीला येतं आणि मांजर होण्याच्या या प्रवासात माझं शरीर मला किती साथ देतं, हे मला पाहायचंच आहे!’

चिआरा इथेच थांबायला तयार नाहीये. तिला आणखी शस्त्रक्रिया करून घ्यायच्या आहेत. ती सांगते, ‘माझे डोळे परफेक्ट  कॅट आय दिसावेत यासाठी मला कँथोप्लास्टी नावाची शस्त्रक्रिया करून घ्यायची आहे, शिवाय मला माझ्या (मानवी) दातांचा आकारही बदलावा लागेल. ट्रान्सडर्मल नावाची शस्त्रक्रिया करून मी माझ्या पार्श्वभागावर फिलर्स भरून घेणार आहे. त्या फिलर्सचा आकार मांजराच्या शेपटीसारखा दिसेल!’ या इतक्या विचित्र शस्त्रक्रिया करून घेताना होणाऱ्या वेदनांचं काय? चिआरा म्हणते, ‘हे एवढं सगळं करायचं म्हणजे वेदना होणारच, पण मी त्या सहज सहन करू शकते.

वेदना काही कायमच्या असत नाहीत! माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढे कष्ट तर मला घ्यावे लागतीलच ना!’ चिआराने तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर ती चर्चेचा विषय न ठरली. अनेक लोकांनी तिला वेड्यात काढण्याचा सपाटा लावला आहे, तिच्यावर प्रचंड टीका होते आहे. हे असले प्रकार सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोकाळतात आणि त्या नादात माणसं आपल्या जगण्याचं वाट्टोळं करून घेतात असंही अनेकांना वाटतं! पण गंमत म्हणजे   चिआराला पाठिंबा देणारे लोकही आहेत. ते म्हणतात, इटस् हर लाइफ! आपण कोण बरं-वाईट ठरवणारे!

आधी कुत्रा, आता मांजर!

याआधी जपानमधल्या अशाच एका अवलियाने चांगले बावीस हजार डॉलर्स खर्च करून आपलं मानवी शरीर कुत्र्यासारखं दिसेल, अशी धडपड केली आहे. या मानवी कुत्र्याचं नाव आहे टोको.  या गृहस्थाने तर ‘आय वाँट टू बी ॲन अँनिमल’ या नावाने  एक यूट्यूब चॅनलसुद्धा  सुरू केलंय. आता या जपानी टोकोनंतर ही इटालियन मानवी-मांजर चर्चेचा विषय ठरली आहे!

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी