शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 20:01 IST

मॅक्रॉन यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानावरून ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली आहे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी (17 जून, 2025) फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर चांगलेच भडकले. मॅक्रॉन यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानावरून ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविरामावर काम करण्यासाठी ग्रुप ऑफ सेवन (जी7) शिखर परिषदेतून लवकर गेले, असे मॅक्रॉन यांनी म्हटले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट करत म्हटले आहे, "पब्लिसिटीची हाव असलेले फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी, मी इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध विरामावर काम करण्यासाठी कॅनडातील जी-7 शिखर परिषद सोडून डीसीला पोहोचलो, असे चूकन म्हटले आहे. 

इमॅन्युएल नेहमीच चुकीचे असतात -ट्रम्प पुढे म्हणाले, "चूक! मी वॉशिंगटनला का जात आहे, हे त्यांना माहीत नाही. मात्र, याचा युद्धविरामाशी काहीही संबंध नाही. याहून मोठी गोष्ट म्हणजे, जाणूनबुजून असो किंवा अनावधानाने, इमॅन्युएल नेहमीच चुकीचे असतात. बघत रहा."

तत्पूर्वी, जी-7 शिखर परिषदेदरम्यान पत्रकारांना संबोधित करताना मॅक्रॉन म्हणाले होते, ट्रम्प इराण आणि इस्रायल यांच्यात संभाव्य युद्धविरामाच्या शक्यतांचा विचार करत होते. 

पुन्हा एकदा चर्चा सुरू करणे आवश्यक : मॅक्रॉन - मॅक्रॉन म्हणाले, "खरे तर बैठक आणि संवादाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.  विशेषतः युद्धविरामासाठी आणि पुन्हा व्यापक चर्चा सुरू करण्यासाठी. आता दोन्ही पक्षा यावर पुढे चालतात की नाही, हे बघावे लागेल. आता मला वाटते की, पुन्हा एकदा चर्चा सुरू करणे आवश्यक आहे. नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे."

फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन पुढे म्हणाले, परिस्थितीत तात्काळ बदल होईल असे वाटत नाही. मात्र, आपण युद्धबंदीचा मार्ग शोधू, असे आश्वासन अमेरिकेने दिले आहे. याशिवाय त्यांच्याकडे इस्रायलवर दबाव आणण्याची क्षमताही आहे. यामुळे परिस्थिती बदलू शकते. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाFranceफ्रान्स