शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांना गद्दारीची शिक्षा मिळाली!’’, वंगबंधूंचा पुतळा पाडल्याबद्दल पाकिस्तानने व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 16:42 IST

Bangladesh Protests: शेख हसीना यांनी बांगलादेशचं पंतप्रधानपद सोडल्यानंतर आंदोलकांनी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. आता या घडामोडींबाबत पाकिस्तानमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शेख हसीना यांना बांगलादेशचं पंतप्रधानपद सोडावं लागलं होतं. दरम्यान, शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून सध्या भारतात आश्रय घेतला आहे‌. शेख हसीना यांनी बांगलादेशचं पंतप्रधानपद सोडल्यानंतर आंदोलकांनी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. आता या घडामोडींबाबत पाकिस्तानमधून आनंद व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी अब्दुल बासित यांनी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनाचं स्वागत केलं आहे. शेख हसीना यांनी सत्तेमधून पायउतार होणं हे पाकिस्तान आणि या भागासाठी चांगले संकेत आहेत. शेख हसीना ह्या पाकिस्तानचा द्वेष करायच्या, तसेच त्या भारताच्या हातचं खेळणं बनल्या होत्या, असा आरोप बासित यांनी केला. तसेच शेख मुजिबूर रहमान यांचा पुतळा तोडल्या बद्दल आनंदही व्यक्त केला. 

बांगलादेशमध्ये घडत असलेल्या घडामोडींबाबत अब्दुल बासित हे सातत्याने यूट्यूबवरून आपलं मत मांडत आहेत. एका व्हिडिओमध्ये अब्दुल बासित यांनी शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याबद्दल बांगलादेशमधील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. जर हसीना यांनी एक महिना आधी राजीनामा दिला असता तर ३०० लोकांचा जीव गेला नसता अशी टीकाही त्यांनी केली.

याच व्हिडिओमधून बासित यांनी शेख हसीना यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, शेख हसीना यांनी बांगलादेशला भारताचे सॅटेलाईट राष्ट्र बनवलं होतं. त्यांच्या मनात पाकिस्तानबाबत द्वेष होता. त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले होते, असा दावाही त्यांनी केला. 

दरम्यान, आणखी एका व्हिडिओमधून अब्दुल बासित यांनी शेख मुजिबूर रहमान यांचा पुतळा तोडल्या बद्दल आनंद व्यक्त केला. ज्यांनी पाकिस्तानसोबत गद्दारी केली, त्याचा काय परिणाम झाला हे आपण काल पाहिले. ज्या प्रकारे शेख मुजिबूर रहमान यांचा पुतळा पाडण्यात आला, त्यामधून सद्दाम हुसेन याच्या तोडलेल्या पुतळ्याची आठवण आली. तसेच त्यांची कन्या शेख हसीना यांनाही बंगलादेशमधून पलायन करावं लागलं

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय