शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोटीत नाही तर 'या' देशांची लोकसंख्या आहे 10 लाखांपेक्षा कमी, भारत-चीनला विसराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 12:58 IST

कोणत्याही देशाच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे त्याची लोकसंख्या.

चीनला मागे टाकत भारत पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. UNFPA च्या अहवालानुसार देशाची लोकसंख्या आता 142.86 कोटींवर पोहोचली आहे. तर चीनची लोकसंख्या 142.57  कोटी आहे. दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये जवळपास 29 लाखांचा फरक आहे. दरम्यान, असे काही देश आहेत, ज्यांची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा कमी आहे.

कोणत्याही देशाच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे त्याची लोकसंख्या. अशा परिस्थितीत ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे, त्यांचा विकास अतिशय संथ गतीने होतो. यामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे ते जाणून घेऊया. लोकसंख्या संशोधन अहवालानुसार, जगात असे अनेक देश आहेत ज्यांची लोकसंख्या खूपच कमी आहे. लोकसंख्या संशोधन अहवालासह, आम्ही भविष्यातील अंदाजांसाठी देश आणि जगातील जन्म आणि मृत्यू दरांच्या मागील ट्रेंडचा अभ्यास करतो.

UNFPA च्या अहवालानुसार, डोमिनिका आणि ग्रेनाडाची लोकसंख्या जगात सर्वात कमी आहे. या दोन्ही देशांची लोकसंख्या सुमारे 0.1 मिलियन म्हणजेच 10 लाखांपेक्षा कमी आहे. दरम्यान, डोमिनिका हे कॅरिबियन समुद्रातील एक बेट आहे. जे 29 मैल लांब आणि 16 मैल रुंद आहे. डोमिनिका हे सुंदर पर्वत आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.

याचबरोबर, ग्रेनाडा वेस्ट इंडीज हे कॅरिबियन समुद्रातील दुसरे बेट आहे. त्याची लोकसंख्याही 10 लाखांपेक्षा कमी आहे. या देशाला 'मसाल्यांचे बेट' असेही म्हणतात. कुराकाओची लोकसंख्या सुमारे 0.2 मिलियन आहे. फ्रेंच गुयाना आणि फ्रेंच पॉलिनेशिया हा जगातील तिसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश आहे. या देशाची लोकसंख्या  0.3 मिलियन आहे.

फ्रेंच गुयाना हा फ्रान्सचा परदेशी भाग आहे. जो दक्षिण अमेरिकेच्या उत्तर किनार्‍यावर आहे. हा 83,534 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. याशिवाय, मकाओ, कोमोरोस आणि फिजीची लोकसंख्याही कमी आहे. या तिन्ही देशांची लोकसंख्याही दहा लाखांपेक्षा कमी आहे. मकाओची लोकसंख्या 0.7 मिलियन आहे. कोमोरोसची लोकसंख्या 0.9 मिलियन आणि फिजीची लोकसंख्या 0.9 मिलियन आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय