शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चंद्रावरून पडलेल्या उल्केचा होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 04:42 IST

१३.५ किग्रॅ वजनाची ही उल्का साधारणपणे फूटबॉलएवढी मोठी असून, तिची २० लाख पौंड (१८.९६ कोटी रुपये ) एवढी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे.

लंडन : ख्रिस्तीज् या जगविख्यात लिलाव कंपनीने चंद्रावरून पृथ्वीवर पडलेल्या एका उल्केचा खासगी लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. १३.५ किग्रॅ वजनाची ही उल्का साधारणपणे फूटबॉलएवढी मोठी असून, तिची २० लाख पौंड (१८.९६ कोटी रुपये ) एवढी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे.पृथ्वीवर सापडलेल्या चंद्रावरील सर्वात मोठ्या उल्कांपैकी ही एक असून, ती आफ्रिकेतील सहारा वाळवंटात सापडली होती. ती ज्याला सापडली त्याच्यापासून अनेकांना विकली जाऊन आता ती लिलावासाठी उपलब्ध झाली आहे, असे ख्रिस्तीजकडून सांगण्यात आले. एखादा लघुग्रह किंवा धुमकेतू आदळून चंद्राच्या पृष्ठभागाचा तुटलेला हा तुकडा पृथ्वीवर पडला असावा, असे मानले जाते.अमेरिकेच्या ‘नासा’ने चंद्रावरील दगडांचे जे नमुने आणले आहेत त्यांच्याशी तुलना करून ही उल्काही चंद्रावरचीच असल्याची खात्री करून घेण्यात आल्याचेही या लिलाव कंपनीचे म्हणणे आहे.(वृत्तसंस्था)