शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमधील राजदूताची हकालपट्टी नाही

By admin | Updated: May 10, 2016 03:15 IST

नेपाळमधील भारतीय राजदूत रणजीत राय यांच्या हकालपट्टीचा सरकार विचार करीत असल्याच्या अफवांचा नेपाळ सरकारने सोमवारी इन्कार केला.

काठमांडू : नेपाळमधील भारतीय राजदूत रणजीत राय यांच्या हकालपट्टीचा सरकार विचार करीत असल्याच्या अफवांचा नेपाळ सरकारने सोमवारी इन्कार केला. ही अफवा असली तरी भारत आणि नेपाळ यांच्यातील आतापर्यंत चांगले असलेले संबंध हळूहळू बिघडत असल्याचे जाणकारांचे मत आहे. नेपाळची नवी राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर मधेशींचे जे आंदोलन झाले, तेव्हापासून संबंधांमध्ये बिघाड व्हायला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे नेपाळ सरकारने चीनशी संबंध सुधारायला सुरुवात केली आहे आणि व्यापार तसेच देशांतर्गत काही प्रकल्पांबाबत चीनशी काही करार केले आहेत. त्यामुळे भारत सरकारही नेपाळच्या पावलांकडे शंकेने पाहत आहे. त्यातच अशा अफवा पसरू लागल्या आहेत. या अफवा ‘निराधार’ व उभय देशांतील द्विपक्षीय संबंध बिघडविण्याच्या हेतूने पसरविण्यात आल्याचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री कमल थापा यांनी म्हटले. नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांचा पहिलाच भारत दौरा रद्द होणे आणि नेपाळचे भारतातील राजदूत दीप कुमार उपाध्याय यांना सरकार माघारी बोलावून घेणार असल्यामुळे निर्माण झालेला वाद या पार्श्वभूमीवर राय यांच्या हकालपट्टीचा सरकार विचार करीत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्या होत्या. राय यांना राजदूताचे असलेले संरक्षण काढून घेण्याच्या विचारात नेपाळ सरकार असल्याचे वृत्तात म्हटले होते. पंतप्रधान के. पी. ओली यांचे सरकार उलथून टाकण्यासाठी उपाध्याय यांनी भारत सरकारशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांना सरकारने माघारी बोलावले असल्याचे बातम्यांत म्हटले होते. विद्यादेवी भंडारी यांचा भारत दौरा नेपाळ सरकारने ७२ तास आधी रद्द केला; परंतु त्याचे कारण जाहीर केले नाही. नेपाळच्या अंतर्गत बाबींमध्ये भारताच्या हस्तक्षेपावरील नाराजी व्यक्त करण्यासाठी भंडारी यांचा दौरा रद्द केल्याचे समजते.