शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जगात केवळ एकच चीन, तैवान त्याचा भाग, विरोधी सरकार सत्तेवर आल्याने ड्रॅगनचा तीळपापड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 19:38 IST

China News: चीनचा झगडा नाही असा त्याच्या शेजारी एकही देश नाही. दरम्यान, तैवान हा तर आपलाच अविभाज्य असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. आता या तैवानमध्ये कट्टर चीनविरोधा पक्षाचा पुन्हा एकदा विजय झाल्याने ड्रॅगनचा जळफळाट झाला आहे.

चीनचा झगडा नाही असा त्याच्या शेजारी एकही देश नाही. दरम्यान, तैवान हा तर आपलाच अविभाज्य असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. आता या तैवानमध्ये कट्टर चीनविरोधा पक्षाचा पुन्हा एकदा विजय झाल्याने ड्रॅगनचा जळफळाट झाला आहे. तैवानमधील निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना चीनने तैवान हा आपला अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तैवानमध्ये जे काही बदल होत आहेत त्याचं पायाभूत तत्त्व हे आहे की, जगामध्ये एकच चीन आहे. तसेच तैवान त्याचा भाग आहे. या तथ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही. चीनने सांगितले की, आम्ही वन चायना पॉलिसीवर विश्वास ठेवतो. तैवानच्या स्वातंत्र्याला आमचा विरोध आहे. वन चायना ह्या आमच्या धोरणात कुठलाही बदल होणार नाही.  तसेच चीनचा सिद्धांत कायम टेवण्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या धोरणातही कुठलाही बदल होणार नाही.  

त्यांनी सांगितले की, तैवान राज्यामध्ये शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी वन चायना पॉलिसी हा भक्कम आधार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायही केवळ वन चायना सिद्धांताचं पालन करेल आणि तैवानच्या स्वातंत्र्याबाबत फुटीरतावादी कृत्यांना विरोध करेल.

तैवानमध्ये सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीची नेते लाई चिंग ते यांनी शनिवारी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता. लाई चिंग आणि त्यांचा पक्ष डीपीटी ही चीनची कट्टर विरोधी मानली जाते. लाई चिंत ते च्या विजयासोबतच त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवत इतिहास रचला आहे.  

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय