शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"...तर गाझातील युद्धबंदी संपवू अन् पुन्हा लढाई सुरू करू!" बेंजामिन नेतन्याहू यांची हमासला खुली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 02:49 IST

नेतन्याहू म्हणाले, "जर हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिस असलेले आमचे नागरिक परत केले नाही, तर युद्धबंदी संपेल आणि हमासचा निर्णायक पराभव होईपर्यंत आयडीएफ (इस्रायली सैन्य) तीव्र लढाई पुन्हा सुरू करेल."

हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिसांची सुटका केली नाही, तर इस्रायल गाझामध्ये पुन्हा लष्करी कारवाई सुरू करेल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी (११ फेब्रुवारी) दिला आहे. त्यांनी सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे.

बाठकीनंतर नेतन्याहू म्हणाले, "जर हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिस असलेले आमचे नागरिक परत केले नाही, तर युद्धबंदी संपेल आणि हमासचा निर्णायक पराभव होईपर्यंत आयडीएफ (इस्रायली सैन्य) तीव्र लढाई पुन्हा सुरू करेल." मात्र, ते सर्व ओलिसांच्या सुटकेसंदर्भात बोलत होते की विशिष्ट समूहासंदर्भात, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

तत्पूर्वी, हमासने इस्रायलवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत ओलिसांच्या सुटकेची प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे युद्धबंदी करार अयशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले.

पुन्हा युद्ध भडकणार...?जर हमासने दिलेल्या मुदतीत बंधकांना अथवा ओलिसांना सोडले नाही तर इस्रायल मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू करू शकतो. मग इस्रायली लष्कराचे (आयडीएफ) उद्दिष्ट हमासचा निर्णायक पराभव करणे असेल. यामुळे गाझामधील युद्ध आणखी तीव्र होऊ शकते. परिणामी प्रादेशिक अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.

सध्यस्थितीत इस्रायली सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. संपूर्ण जगाचे लक्ष शनिवारच्या अंतिम मुदतीकडे लागले आहे. हमासने बंधकांना अथवा ओलिसांना सोडले नाही, तर पुन्हा एकदा भयंकर युद्धाला तोंड फुटू शकते आणि गाझा पुन्हा युद्धभूमी होऊ शकते. यामुळे, गाझामध्ये युद्धबंदी कायम राहणार की पुन्हा लढाई सुरू होणार, हे शनिवारचा दिवसच ठरवेल.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायल