शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

...तर भारत-चीनमधील प्रश्न सुटू शकतो

By admin | Updated: March 4, 2017 04:37 IST

तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो

बीजिंग : तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो, असा दावा चीनच्या परराष्ट्र संबंधविषयक एका अधिकाऱ्याने केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र चीनच्या अधिकाऱ्यांचा हा प्रस्ताव लगेचच फेटाळला. त्यांनी स्पष्ट केले की, तवांग हा अरुणाचल प्रदेशचा अविभाज्य भाग असून १९५० पासून येथे संसद सदस्य निवडून येत आहेत. २००३ ते २०१३ या काळात भारतासोबत सिमा चर्चेत चीनचे अधिकारी राहिलेले दाई बिनगुओ यांनी चीनच्या मीडियाशी बोलताना सांगितले की, जर भारताने पूर्व भागात चीनच्या चिंताबाबत, प्रश्नांबाबत लक्ष दिले तर चीनही त्याला अनुरुप असा प्रतिसाद देईल आणि भारताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. तवांगसह चीन - भारत सिमेवरील वादग्रस्त पूर्व भागाची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि प्रशासकीय कार्यकक्षा पाहता हा भाग चीनसाठी अविभाज्य भाग आहे. ‘मॅकमोहन रेषा’आखणाऱ्या ब्रिटन सरकारनेही तवांगवरील बीजिंगचा दावा मान्य केला होता, असेही ते म्हणाले. चीनने भारताच्या बाबतीत ‘मॅकमोहन रेषा’फेटाळली होती, तर म्यानमारबाबत सीमावाद सोडविण्यास याचा स्वीकार केला होता. दाई बिनगुओ म्हणाले की, मॅकमोहन रेषा आखणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनीही चीनच्या अधिकाराचा सन्मान केला होता आणि तवांग चीनचा भाग होता असे मान्य केले होते. अर्थात, दाई यांनी हे स्पष्ट केले नाही की, ३,४८८ किमी लांब नियंत्रण रेषेवर चीन नेमकी कुठे सूट देऊ शकतो. सीमा चर्चेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातही यावर भाष्य करण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)>बीजिंग : तवांगवरील चीनचा दावा मान्य केल्यास भारत आणि चीन यांच्यातील सिमा प्रश्न सुटू शकतो, असा दावा चीनच्या परराष्ट्र संबंधविषयक एका अधिकाऱ्याने केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र चीनच्या अधिकाऱ्यांचा हा प्रस्ताव लगेचच फेटाळला. त्यांनी स्पष्ट केले की, तवांग हा अरुणाचल प्रदेशचा अविभाज्य भाग असून १९५० पासून येथे संसद सदस्य निवडून येत आहेत. २००३ ते २०१३ या काळात भारतासोबत सिमा चर्चेत चीनचे अधिकारी राहिलेले दाई बिनगुओ यांनी चीनच्या मीडियाशी बोलताना सांगितले की, जर भारताने पूर्व भागात चीनच्या चिंताबाबत, प्रश्नांबाबत लक्ष दिले तर चीनही त्याला अनुरुप असा प्रतिसाद देईल आणि भारताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. तवांगसह चीन - भारत सिमेवरील वादग्रस्त पूर्व भागाची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि प्रशासकीय कार्यकक्षा पाहता हा भाग चीनसाठी अविभाज्य भाग आहे. ‘मॅकमोहन रेषा’आखणाऱ्या ब्रिटन सरकारनेही तवांगवरील बीजिंगचा दावा मान्य केला होता, असेही ते म्हणाले. चीनने भारताच्या बाबतीत ‘मॅकमोहन रेषा’फेटाळली होती, तर म्यानमारबाबत सीमावाद सोडविण्यास याचा स्वीकार केला होता. दाई बिनगुओ म्हणाले की, मॅकमोहन रेषा आखणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनीही चीनच्या अधिकाराचा सन्मान केला होता आणि तवांग चीनचा भाग होता असे मान्य केले होते. अर्थात, दाई यांनी हे स्पष्ट केले नाही की, ३,४८८ किमी लांब नियंत्रण रेषेवर चीन नेमकी कुठे सूट देऊ शकतो. सीमा चर्चेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातही यावर भाष्य करण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)>सर्वोच्च न्यायालयाने १९५६ मध्ये एका प्रकरणात स्पष्ट केले होते की, घटनात्मक दुरुस्तीशिवाय हा भाग दुसऱ्या सरकारच्या स्वाधीन करता येणार नाही.