शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

ब्रिटनच्या राणीला धनुष्यबाणद्वारे मारायचे होते तरुणाला, न्यायालयाने सुनावली ९ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 11:47 IST

न्यायालयाने तरुणाचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन त्याला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

​ब्रिटनची राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी ब्रिटनच्या न्यायालयाने एका २१ वर्षीय शीख तरुणाला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. जसवंत सिंग चैल असे या शीख तरुणाचे नाव आहे. या तरुण २०२१ मध्ये राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांना धनुष्यबाणद्वारे मारणार होता. यासाठी तो एलिझाबेथ (द्वितीय) यांच्यापर्यंत आला होता. मात्र, त्यावेळी तेथील पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले होते. 

दरम्यान, न्यायालयाने तरुणाचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन त्याला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लंडनमधील ओल्ड बेली नायालयाच्या सुनावणीत न्यायाधीश निकोलस हिलिअर्डने निर्णय दिला की, जसवंत सिंग चैल या तरुणाला बरे होईपर्यंत बर्कशायरमधील उच्च-सुरक्षित मानसिक रुग्णालय ब्रॉडमूरमध्ये ठेवले पाहिजे. यानंतर त्याला कोठडीत ठेवण्यात येईल.

२५ डिसेंबर २०२१ रोजी राणी एलिझाबेथ (द्वितीय) या विंडसर कॅसल येथे आपल्या खाजगी अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्यावेळी अपार्टमेंटच्या परिसरात जसवंत सिंग चैल हा आपल्या हातात धनुष्यबाण घेऊन उभा असल्याचे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिले. यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता राणी एलिझाबेथ (द्वितीय)  यांना मारण्यासाठी धनुष्यबाण आणल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांना त्याला आपल्या ताब्यात घेतले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसवंत सिंह चैल याने 'स्टार वॉर्स' मालिकेपासून प्रेरित होऊन अशा पद्धतीने हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, त्याने सोशल मीडियावर एका व्हिडिओमध्ये सांगितले की, पंजाबच्या अमृतसरमध्ये १३ एप्रिल १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी आपण हे केले. दरम्यान, शिक्षेच्या आदेशामागील त्याच्या तर्काचे स्पष्टीकरण देताना न्यायाधीश म्हणाले, "या कृतीची कल्पना २०२१ मध्ये झाली होती, जेव्हा जसवंत सिंग चैल हा तरुण मानसिकदृष्ट्या निरोगी होता."

याचबरोबर, जसवंत सिंग चैलने हत्येचा कट रचला होता, त्यासाठी त्याला शिक्षा देणे आवश्यक असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. सुनावणीदरम्यान, न्यायालयाला सांगण्यात आले की, जसवंत सिंग चैल हा २०१८ मध्ये आपल्या कुटुंबासह अमृतसरला गेला होता आणि त्याठिकाणी त्याला जालियनवाला बाग हत्याकांडाची माहिती मिळाली. तेव्हाच त्याने राणी एलिझाबेथ (द्वितीय)  यांची हत्या करण्याचा विचार केला होता.

किंग चार्ल्स यांच्याकडे मागितली माफीदरम्यान, राणी एलिझाबेथ (द्वितीय)  यांचे सप्टेंबर २०२२ मध्ये वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या महिन्यात जजसवंत सिंग चैल याने एका पत्राद्वारे शाही परिवार आणि किंग चार्ल्स (तृतीय) यांची माफी मागितली होती. न्यालायलच्या अहवालानुसार जसवंत सिंग चैल चांगल्या कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील एरोस्पेसमध्ये सॉफ्टवेअर सल्लागार आहेत, तिची आई शिक्षिका आहे आणि त्याच्या दोन जुळ्या बहिणी सध्या शिक्षण घेत आहेत. जसवंत सिंग चैलने राणीच्या हत्येचा कट रचला असला तरी त्यासाठी त्याला न्यायालयाने ९ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

टॅग्स :Queen Elizabeth IIमहाराणी एलिझाबेथ द्वितीयLondonलंडनCourtन्यायालय