शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण अंतराळ लवकरच ड्रॅगनच्या विळख्यात; सॅटेलाइट उद्ध्वस्त करण्यावर काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 05:36 IST

अत्याधुनिक सॅटेलाइट नेटवर्क ताकदीच्या जोरावर चीन इतर देशांच्या सॅटेलाइटवर नियंत्रण मिळवणे, ते पाडणे आदी मनसुबे रचत आहे. सॅटेलाइट पाडण्याच्या लेझर सिस्टिमवर चीनने काम सुरू केले आहे. 

लंडन : आक्रमक रशियाच्या विस्तारवादाचे चटके बसत असतानाच चीनच्या कृत्यांची झळही जगाला सोसावी लागणार आहे. इंग्लंडच्या गुप्तहेर संस्थेचे प्रमुख जेरेमी फ्लेमिंग यांनी इशारा दिला आहे की, चीनने आता अंतराळात आपली ताकद वाढवण्यासाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. अत्याधुनिक सॅटेलाइट नेटवर्क ताकदीच्या जोरावर चीन इतर देशांच्या सॅटेलाइटवर नियंत्रण मिळवणे, ते पाडणे आदी मनसुबे रचत आहे. सॅटेलाइट पाडण्याच्या लेझर सिस्टिमवर चीनने काम सुरू केले आहे. 

फ्लेमिंग म्हणाले की, एक पक्षीय रचना हे चीनचे बलस्थान आहे. या माध्यमातून चीनचा भर त्यांच्या नागरिकांवर अधिकाधिक अंकुश कसा ठेवता येईल, याकडे असतो. तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून तेथील सरकार नागरिकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध क्लृप्त्या शोधत असते. अर्थव्यवस्थेला अधिकाधिक बळकट करण्यासाठी देशातील नागरिकांनी अहोरात्र झटत राहावे आणि पक्षाने देशाच्या संसाधनांचा वापर करून सुरक्षा आणि निगराणीचे कायदे अधिक कठोर करण्याकडे लक्ष द्यावे, याकडे चीनचे सतत लक्ष असते. 

अंतराळात स्टार वॉर्सफ्लेमिंग यांनी इशारा दिला की, अंतराळावर कब्जा करण्यासाठी चीन स्टार वॉर्स चित्रपटांप्रमाणे हत्यारे विकसित करणार आहे. चीन आणि रशिया दोनच देशांकडे सॅटेलाइटविरोधी शस्त्रे आहेत. चीन अशी लेझर सिस्टिम विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे जी शत्रू देशांचे दूरसंचार सेवा आणि निगराणीसाठी उपयुक्त असणारे सॅटेलाइट नष्ट करू शकते. सॅटेलाइट नष्ट केल्याने शत्रूला आपल्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मागही काढता येणार नाही.

टॅग्स :chinaचीन