शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साखरझोपेत क्षणात झाले हाेत्याचे नव्हते; भूकंपाचा तीव्र धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 07:01 IST

मोराेक्कोत ७.२ रिश्टरचा भूकंप; १०३७ जणांचा मृत्यू; १२०० हून अधिक जखमी

रबात (माेराेक्काे) : साखरझाेपेत असताना अचानक जमिनीला हादरे बसू लागतात. काही कळायच्या आत सारे काही संपलेले असते. आफ्रिकेतील माेराेक्काे या देशाला शुक्रवारी रात्री उशिरा ७.२ रिश्टर एवढ्या जबरदस्त तीव्रतेच्या भूकंपाने हादरा दिला. 

भूकंपामुळे १०३७ पेक्षा जास्त लाेकांचा मृत्यू झाला असून, १२०० पेक्षा जास्त लाेक जखमी झाले आहेत. २०० पेक्षा जास्त लाेकांची प्रकृती गंभीर आहे. भूकंपाची तीव्रता एवढी प्रचंड हाेती की, अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे काेसळल्या. त्यात अजूनही शेकडाे लाेक दबले असण्याची शक्यता असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.. माेराेक्कोतील गेल्या १२० वर्षांतील हा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप आहे. पाेर्तुगाल, अल्जेरिया व आजूबाजूच्या काही देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

सर्वत्र काेसळलेल्या इमारतींचा मलबाभूकंपाचा फटका बसलेल्या शहरांमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. नजर जाईल तिथे काेसळलेल्या इमारती दिसतात. मलब्यातून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. पर्वतांवरील गावांमध्येही प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, तेथील माहिती मिळण्यास वेळ लागू शकताे.

भूकंपप्रवण नसूनही...उत्तर आफ्रिकेच्या या भागात सहसा भूकंप हाेत नाही. मात्र, जेव्हा भूकंप झाला, तेव्हा माेठ्या प्रमाणावर प्राणहानी झालेली आहे. यापूर्वी १९६०मध्ये आलेल्या ५.८ रिश्टर भूकंपामध्ये हजाराे लाेकांचा मृत्यू झाला हाेता. सहसा भूकंप हाेत नसल्याने इमारतींचे बांधकाम भूकंपरोधक केले जात नाही. 

आमच्या संवेदना तुमच्या साेबत : माेदीमाेराेक्काेतील भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘माेराेक्काेमध्ये भूकंपामुळे झालेल्या प्राणहानीने अतिशय दु:ख झाले आहे.  माझ्या संवेदना माेराेक्काेच्या लाेकांसाेबत आहेत. भारताकडून माेराेक्काेला मदत केली जाईल.’

जे बाहेर पडले ते वाचलेस्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी भूकंप झाला. जमिनीला हादरे बसू लागले. ज्यांना लक्षात आले, ते तातडीने घराबाहेर आले आणि वाचले. अनेक जण झाेपेतच असल्याने शेकडाेंचे प्राण गेले. 

टॅग्स :EarthquakeभूकंपNarendra Modiनरेंद्र मोदी