शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर अर्थ’वर जीवसृष्टी असण्याची शक्यता; आपल्या आकाशगंगेजवळील ग्रहाबद्दल संशोधन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 07:09 IST

या नव्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्याचा अंश असण्याची शक्यता खगोलशास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पृथ्वीसारखीच जीवसृष्टी असण्याची शक्यता असलेल्या एका नव्या ग्रहाचा शोध खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे. रॉस ५०८ बी या नावाने ओळखला जाणारा हा ग्रह ‘सुपर अर्थ (पृथ्वी)’ या नावानेही प्रसिद्ध आहे. तो ग्रह आपल्या सौरमालेच्या व आकाशगंगेच्या जवळ आहे. 

या नव्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्याचा अंश असण्याची शक्यता खगोलशास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. जेम्स वेब अंतरिक्ष दुर्बिणीच्या साह्याने रॉस ५०८ बी या ग्रहाचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे. सुबारू टेलिस्कोपच्या साह्याने खगोलशास्त्रज्ञांनी हा ग्रह सर्वप्रथम शोधून काढला. आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांपैकी तीन चतुर्थांश तारे हे लाल रंगाचे छोट्या आकाराचे तारे आहेत. असे तारे आपल्या सूर्यमालेच्या आसपास मोठ्या संख्येने अस्तित्वात आहेत. त्यांच्याबाबत संशोधन करत असताना रॉस ५०८ बी या ग्रहाचा शोध लागला. 

ब्रह्मांडातील छोट्या आकाराचे लाल ताऱ्यांचे निरीक्षण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र, हे तारे दृश्यमान प्रकाशातही खूप धूसर दिसतात. (वृत्तसंस्था)

सुस्पष्ट छायाचित्रे गवसली नाहीतखगोलशास्त्रज्ञांनी सांगितले की, रॉस ५०८ बी या ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असण्याची शक्यता आहे. सध्या अवकाश संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या दुर्बिणींचा रोख या ग्रहाच्या मध्यवर्ती ताऱ्याजवळील परिस्थितीचे निरीक्षण करण्याकडे आहे. त्यामुळे  रॉस ५०८ बी या ग्रहाची अतिशय सुस्पष्ट छायाचित्रे टिपणे शक्य होत नाही. 

सुपर अर्थ पृथ्वीपासून ३७ प्रकाशवर्षे दूर अंतरावररॉस ५०८ बी हा ग्रह पृथ्वीपासून ३७ प्रकाशवर्षे दूर आहे. त्याचे वस्तुमान  सूर्याच्या वस्तुमानाच्या एक पंचमांश आहे. या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा चार पट आहे. हा ग्रह व त्याचा मध्यवर्ती तारा यांच्यातील अंतर पृथ्वी व सूर्यातील अंतरापेश्रा ०.०५ पट अधिक आहे.

४००० अंशांपेक्षा या ताऱ्यांच्या पृष्ठभागावरील तापमान कमी असते. अशा लाल ताऱ्यांपैकी शोधण्यात आलेला, नीट निरीक्षण सुरू असलेला प्रॉक्सिमा सेंटॉरी बी हा एकमेव तारा आहे.