शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राच्या तळाशी पिवळ्या विटांचा रहस्यमय रस्ता, शास्त्रज्ञही झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 07:01 IST

सागरी शास्त्रज्ञांच्या गटाने पॅसिफिक महासागराच्या तळाशी एक विचित्र पिवळा विटांचा मार्ग शोधला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अंतराळात आणि समुद्राच्या आत अनेक रहस्ये दडलेली आहेत, असे अनेकदा म्हटले जाते. यांच्याशी संबंधित विविध शोधदेखील समोर येत असतात. पण, यावेळी समुद्राच्या तळाशी चक्क एक रस्ता सापडला आहे, जो पाहून शास्त्रज्ञांसह सगळेच थक्क झाले आहेत.

सागरी शास्त्रज्ञांच्या गटाने पॅसिफिक महासागराच्या तळाशी एक विचित्र पिवळा विटांचा मार्ग शोधला आहे. ‘एक्सप्लोरेशन व्हेसेल नॉटिलस’च्या अभ्यासकांनी हा लपलेला रस्ता शोधला. अमेरिकेतील ‘पापहानोमोकुआके मरिन नॅशनल मोन्युमेंट’मधील (पीएमएनएम) लिलीउओकलानी रिज नावाच्या क्षेत्राचा अभ्यास करताना त्यांनी विचित्र दिसणारी रचना पाहिली. हा रस्ता हवाई बेटांच्या उत्तरेला आढळला आहे. हे जगातील सर्वात मोठ्या सागरी संवर्धन क्षेत्रांपैकी एक आहे. 

पीएमएनएमचे क्षेत्र प्रचंड मोठे असून,  तिथे खोली ३,००० मीटरच्याही पुढे जाते. आतापर्यंत संपूर्ण क्षेत्रापैकी फक्त ३ टक्के भाग शोधला गेला आहे. सध्या ही कुठल्या जुन्या सभ्यतेची किंवा कुठल्या रस्त्याची चिन्हे नसून, हजारो वर्षांपूर्वीचा तलाव कोरडा पडल्याने तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा पाण्याखालील संरचना ‘सीमाउंट’ म्हणजे एकप्रकारे समुद्रातील पर्वत म्हणून ओळखल्या जातात. सीमाउंट्स हे ज्वालामुखीच्या क्रियाकलापांनी तयार झालेले पर्वत होत. पुढे, संशोधकांनी स्पष्ट केले की, खडकामधील फ्रॅक्चरचा ‘अद्वितीय’ नमुना ज्यामुळे ‘कोबल्ड’ तयार होते, बहुधा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वारंवार गरम होणे आणि वेळोवेळी थंड होण्याचा परिणाम आहे. यापूर्वी या क्षेत्राचे सर्वेक्षण केले नाही, परंतु आता याचा सखोल अभ्यास करणार आहे, असेही संशोधकांनी नमूद केले आहे. 

 मोहिमेचे उद्दिष्ट नॉटिलस एप्रिलपासून या भागाचा आणि आसपासच्या परिसरात शोधमोहिम राबवीत आहे.  या मोहिमांचा सर्वात चांगला भाग म्हणजे केवळ संशोधकच नाही तर इंटरनेट असलेली कोणीही व्यक्ती युट्यूबवरही पाहू शकतात.  आतापर्यंत मनुष्य पोहोचू न शकलेल्या खोलीपर्यंत पोहोचणे आणि पृथ्वीच्या लपलेल्या भूविज्ञानाबद्दल अधिक जाणून घेणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्ग