शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१०० दिवसांच्या युक्रेन-रशिया युद्धात उद्ध्वस्त झाला बाजार;जागतिक अर्थव्यवस्थांवर मंदीची छाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 07:00 IST

जागतिक अर्थव्यवस्थांवर मंदीची छाया; महागाई उच्चांकामुळे अन्नधान्याचे संकट

नवी दिल्ली : ज्या युद्धाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केवळ ७२ तासांमध्ये संपवण्याची घोषणा केली होती, ते युद्ध आता १०० पेक्षा अधिक दिवस सुरू आहे. युद्धामुळे रशिया आणि युक्रेनचे मोठे नुकसान होत असून, त्यामध्ये अगोदरच कोरोनामुळे गर्भगळीत झालेल्या जगभरातील अर्थव्यवस्थांवरही संकटांचे काळे ढग दाटून आले आहेत. युक्रेन संकटांमुळे भारतासह जगभरातील महागाई नव्या उच्चांकावर पोहोचली असून, रुपयातही मोठी घसरण झाली आहे. त्याचा फटका देशाला बसतो आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारा व्यापार पूर्णपणे ठप्प पडला आहे. गहू, तेलासह सर्वच वस्तूंचा पुरवठा थांबल्याने जगभरात अत्यावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा भासत आहे. यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. ४५ देशांमध्ये अन्नधान्य संकट निर्माण झाले आहे. फायदा कमावण्यासाठी जगभरातील गुंतवणूकदारांनी कृषी कमोडिटीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे, यामुळे अन्नपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. युक्रेन संकटामुळे भारतासह जगभरातील शेअर बाजारांमध्ये ७ ते १५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

रुपयाची पत ढासळल्याने आयात महागयुद्ध सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ७४ रुपयांच्या आसपास होता. मात्र, आता तो ७७.७ च्या स्तरापर्यंत खाली घसरला आहे. रुपया कमकुवत झाल्याने देशाच्या आयातीवर परिणाम होत असून, कच्चे तेल महाग झाले आहे.

जगभरात महागाईयुद्धामुळे जगभरात महागाई अनेक पटींनी वाढली आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन व युरोपियन संघासह जगभरातील देशांमध्ये उच्चांकी स्तरावर महागाई आहे. एप्रिलमध्ये भारताचा वार्षिक महागाई दर ७.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात तेल, गहू, साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय