वॉश्गिंटन - कुख्यात लैंगिक गुन्ह्यातील आरोपी जेफ्री एपस्टीनच्या काळ्या करारनाम्याची शिकार राहिलेल्या तरुणीने कित्येक वर्षांनी तिचं मौन सोडले आहे. या भयानक अनुभवांनी तिचे आयुष्यच बदललं. एपस्टीन केवळ तिच्यासोबत शारीरिक छळ करत नव्हता तर तो मानसिक आणि भावनात्मक शोषण करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर करायचा आणि जीवे मारण्याची धमकी देत गप्प बसायला भाग पाडायचा असं या पीडित तरुणीने सांगितले आहे.
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने सांगितले की, १९९० साली जेव्हा मी २१ वर्षांची होते तेव्हा एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी माझी ओळख एपस्टीनशी झाली. त्याने विना अट मला स्कॉलरशिप देण्याचं आमिष दाखवून त्याच्या जाळ्यात ओढले. त्याशिवाय मला त्याला पुन्हा भेटण्याची गरज नाही असंही तो म्हणाला. परंतु त्यानंतर एपस्टीन वारंवार बोलावू लागला. जेव्हा मी त्याला भेटण्यास नकार देत होते तेव्हा त्याने मला स्कॉलरशिप परत घेण्याची धमकी दिली. जेव्हा फ्लोरिडा येथील त्याच्या आलिशान घरी पोहचली तेव्हा तिथले दृश्य भयंकर होते. मी कुठे आहे हे खरेच माहिती नव्हते. देशाच्या त्या भागात हा माझा पहिलाच अनुभव होता असं तिने म्हटलं.
त्याठिकाणी आणखी एक मुलगी होती. दुसरे लोक सहजपणे तिथे वावरत होते परंतु मला तसे करता येत नव्हते. माझ्याकडे ट्रान्सपोर्टेशन आणि पैसेही नव्हते. एपस्टीनच्या घरात बहुतांश विजिटर मसाज रुममध्ये जात होते. तिथे कॉफी टेबलवर काही पुस्तके, फोन कॉल्स पाहून काहीतरी गडबड आहे याची जाणीव झाली. जर मी यातले बाहेर काही सांगितले तर तो मला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी एपस्टीनने दिली होती. एपस्टीन सायकोलॉजिकल दबाव आणून माणसांवर नियंत्रण आणायचा. इथे केवळ शारीरिक शोषण नाही तर मानसिकही शोषणही व्हायचे असं या पीडित तरुणीने म्हटलं.
दरम्यान, ब्रिटनचे माजी प्रिन्स एँड्रयू माऊंटबॅटन विंडसरच्या अटकेनंतर या पीडितेने हा अंत नाही तर सुरुवात आहे अशी प्रतिक्रिया दिली. अमेरिकन सरकार या प्रकरणावर कारवाई करत नाही. जबाबदारीपासून ते पळ काढत आहे. एपस्टीन फाईल्समध्ये ज्यांची नावे आली आहेत त्यांची चौकशी व्हायला हवी. एपस्टीन फाईल्समध्ये जगातील काही सर्वात श्रीमंत आणि सर्वात ताकदवान लोकांची नावे आहेत. नेत्यांनाही यातून सूट मिळायला नको. जर ट्रम्प यांचे नाव असेल तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यांना सर्वकाही माहिती आहे. कायदा सर्वांसाठी समान असावा. तपासाची निगडित लाखो दस्तावेज अजूनही सार्वजनिक का केले नाहीत. जोपर्यंत सर्व तथ्ये समोर येणार नाही तोपर्यंत न्याय अर्धवट आहे असं या पीडितेने सांगितले.
Web Summary : An Epstein victim recounts being lured with a scholarship, then sexually and psychologically abused. She demands accountability, investigation into Epstein's files, and justice for all involved, regardless of status.
Web Summary : एपस्टीन की एक पीड़िता ने छात्रवृत्ति के साथ लालच दिए जाने, फिर यौन और मनोवैज्ञानिक रूप से दुर्व्यवहार किए जाने का वर्णन किया। उसने जवाबदेही, एपस्टीन की फाइलों की जांच और सभी शामिल लोगों के लिए न्याय की मांग की, चाहे उनकी स्थिति कुछ भी हो।