शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जपानमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी मोदींचे स्वागत, हिंद-प्रशांत महासागरवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 07:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी; भारत-जपानमध्ये उत्तम सहकार्य

टोकियो : हिंद-प्रशांत महासागराचा प्रदेश मुक्त, सर्वांना सामावून घेणारा, प्रत्येक देशाचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता यांचा आदर करणारा असावा याकरिता भारत व जपान एकजुटीने प्रयत्न करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या प्रदेशातील सुरक्षा अबाधित राखण्यावर दोन्ही देशांचा कटाक्ष असेल, असेही मोदी यांनी सांगितले.

क्वाड परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून जपानच्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी जपानच्या एका अग्रगण्य दैनिकात एक लेख लिहिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत भारताने उत्पादन, सेवा क्षेत्र, कृषी तसेच डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये पाया मजबूत करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी जपानचे चांगले सहकार्य मिळत आहे. (वृत्तसंस्था)

‘जय श्रीराम’च्या घोषणांनी मोदींचे स्वागतपंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियो विमानतळावरून तेथील हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा तिथे जपानमधील भारतीय वंशाच्या लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत मोदी यांचे जोरदार स्वागत केले. या लोकांच्या हातात काही फलक होते. ‘जो काशी को चमकाए है, वो टोकियो आए है, जो राम को लाए है, वो टोकियो आए है’ अशा घोषणा या फलकांवर लिहिलेल्या होत्या. 

जपानी बालकाने केले हिंदीतून संभाषणरित्सुकी कोबायाशी हा जपानी बालक अस्खलित हिंदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणाला, “जपानमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमची मला स्वाक्षरी मिळू शकेल का?” त्यामुळे आनंदी झालेल्या मोदींनी त्याला विचारले की, “खूप छान हिंदी बोलतोस. ही भाषा कुठे शिकलास?” त्यावर रित्सुकीने उत्तर दिले, “मला हिंदी उत्तम बोलता येत नाही. पण, त्या भाषेत कोणी बोलले तर मला ते  कळते. आता तुमची स्वाक्षरी मिळाली. मी खूश आहे.” 

टोकियो : भारतात तंत्रज्ञान, ऊर्जा, वित्त, संशोधन या क्षेत्रामध्ये जपानच्या सॉफ्टबँक कॉर्पोरेशनने मोठी गुंतवणूक करण्यासंदर्भात त्या कंपनीचे संस्थापक व सीईओ मासायोशी सॉन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चर्चा केली. या कंपनीने पेटीएम, पॉलिसी बाझारमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. इलेक्ट्रिकल मोटारींचे उत्पादन व त्याबाबतचे संशोधन तसेच भारतात पुनर्प्रक्रिया केंद्रे उभारण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो येथे सोमवारी सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे सल्लागार ओसामू सुझुकी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सुझुकी कंपनीने भारतात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहनही मोदी यांनी ओसामी सुझुकी यांना केले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJapanजपान