शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रशियामध्ये हॅकर्सचा ‘खेळ’, एकाच ठिकाणी आणल्या सर्व टॅक्सी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 12:05 IST

मॉस्कोमधील यांडेक्स टॅक्सीसाठी काम करणाऱ्या डझनभर चालकांना सुरुवातीला काय होत आहे याची कल्पना नव्हती. वाहतूक पूर्ण ठप्प झाल्यानंतर चालकांनी एकमेकांशी संवाद साधला असता सर्वांचे पिकअप पॉईंट एकच दाखवत असल्याचे समजले...

मॉस्को : रशियामध्ये गुरुवारी हॅकर्सनी एक विचित्र घटना घडवली. रशियातील कॅब सेवा देणारी सर्वांत मोठी ‘यांडेक्स टॅक्सी’ या कंपनीचे सॉफ्टवेअर हॅकर्सनी हॅक केले. ॲप हॅक केल्यानंतर हॅकर्सनी एका कमांडद्वारे सर्व टॅक्सी एकाच ठिकाणी पाठविल्या. प्रचंड वाहतूककोंडी झाल्यानंतर वाहनचालकांना हा प्रकार समजला. ४० मिनिटे हा प्रकार सुरू होता. सतत टॅक्सी येत राहिल्या. परिणामी तीन तास वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. त्यानंतरच ठप्प झालेला रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला.  मॉस्कोमधील यांडेक्स टॅक्सीसाठी काम करणाऱ्या डझनभर चालकांना सुरुवातीला काय होत आहे याची कल्पना नव्हती. वाहतूक पूर्ण ठप्प झाल्यानंतर चालकांनी एकमेकांशी संवाद साधला असता सर्वांचे पिकअप पॉईंट एकच दाखवत असल्याचे समजले. सायबर तज्ज्ञांच्या मते, हॅकर्सने यांडेक्सची सुरक्षा प्रणाली हॅक करून फेक राइडची ऑर्डर केली. या सर्व राइड्सचे पिकअप लोकेशनही एकाच ठिकाणी होते, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.  

सायबर न्यूजच्या रिपोर्टनुसार, हॅकर्सनी मॉस्कोमधील प्रमुख मार्ग असलेले कुतुझोव्स्की प्रॉस्पेक्ट हेच सर्व कॅबचे पिकअप  लोकेशन दिले होते. याच मार्गावर ‘हॉटेल युक्रेन’देखील आहे. या घटनेचा युक्रेन-रशिया युद्धाशीही संबंध असू शकतो, असे बोलले जात आहे. तथापि, यांडेक्स टॅक्सी हॅकसाठी कोण जबाबदार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्विटरवर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

टॅग्स :carकारrussiaरशिया