शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे जनतेतील ‘ड्रॅगन’ खवळले; म्हणाले.. जिनपिंग खुर्ची सोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 06:59 IST

कोरोना लॉकडाउनमुळे चीनमध्ये वातावरण तापले

बीजिंग : चीनमधील शून्य कोरोना धोरणाविरोधात लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. बीजिंगपासून सुरू झालेली ही निदर्शने आता १३ मोठ्या शहरांपर्यंत पसरली आहेत. नागरिकांना रोखण्यासाठी पोलिस लाठीमार करून लोकांना अटक करत आहेत, मात्र लोकांचा राग वाढत आहे. रविवारी रात्रभर लोकांनी रस्त्यावर निदर्शने सुरूच ठेवत चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची खुर्ची सोडावी, अशी मागणी केली. नागरिक लॉकडाऊन हटवून स्वातंत्र्य देण्याची मागणी करत घोषणा देत आहेत. 

लोक इतके नाराज का? n चीनमध्ये गेल्या १० महिन्यांपासून झिरो कोरोना धोरण लागू आहे. विविध निर्बंध आहेत, परंतु २५ नोव्हेंबर रोजी चीनमधील शिंजियांगमध्ये एका इमारतीच्या १५व्या मजल्यावर आग लागल्याने संतापाचा भडका उडाला. n या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे मदत वेळेवर पोहोचू शकली नाही. n अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यानंतर बीजिंगमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि निदर्शने सुरू झाली.

आंदोलन कुठे? राजधानी बीजिंग येथून हे आंदोलन सुरू झाले आणि लाँचो, शिआन, चोंगकिंग, वुहान, झेंगझोऊ, कोरला, होटन, ल्हासा, उरुमकी, शांघाय, नानजिंग, शिजियाझुआंग येथे पोहोचले. तीन दिवसांपासून येथील लोक सरकारविरोधात घोषणा देत आहेत.६६ लाख घरात कैदचीनमध्ये कोरोना सातत्याने वाढत आहे. २७ नोव्हेंबर रोजी कोरोनाचे ४० हजार रुग्ण आढळले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. चीनमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे.  

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या