शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

बॉम्ब सायक्लोनचा कहर; अमेरिकेत लाखो घरांमधील बत्ती गुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 07:17 IST

अमेरिकेत बॉम्ब सायक्लोनचा कहर सुरूच असून, या हिमवादळामुळे मृतांचा आकडा जवळपास ६० झाला आहे.

न्यूयॉर्क: अमेरिकेत बॉम्ब सायक्लोनचा कहर सुरूच असून, या हिमवादळामुळे मृतांचा आकडा जवळपास ६० झाला आहे. न्यूयॉर्कमधील बफेलो शहरात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत येथे २८ जणांना जीव गमवावा लागला आहे. 

बर्फात गाडलेल्या वाहनांमध्येही लोकांचे मृतदेह सापडत आहेत, त्यामुळे मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्य़ाची भीती अधिकारी वर्तवत आहेत. बफेलोमध्ये घरांवर आणि रस्त्यांवर ४ ते ८ फूट बर्फ साचला आहे. बफेलोमधील अधिकारी वाहनचालकांना जिवंत किंवा मृत शोधण्यासाठी प्रत्येक कार तपासत आहेत.  लाखो लोकांच्या घरी वीज आणि पाणी नाही. लुटमारीच्या घटनाही समोर येत आहेत. 

बर्फाचा थर तुटल्याने ३ भारतीय ठार

नारायण मुद्दना, हरिता मुद्दना, गोकुळ मेडिसेती या तीन भारतीय वंशाच्या व्यक्ती अमेरिकेतील एरिझोना येथे वूड्स केन्यॉन तलावावरून फिरत होते. बर्फाचा थर तुटल्यामुळे ते तलावात घुसले आणि त्यांचा मृत्यू झाला. 

हजारो उड्डाणे रद्द

हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली असून, लोक हैराण झाले आहेत. मंगळवारी ५,००० उड्डाणे रद्द करण्यात आली, तर बुधवारी  नियोजित सुमारे ३,५०० उड्डाणे देखील अगोदरच रद्द करण्यात आली. कॅनडालाही या वादळाचा फटका बसला असून, तापमान उणे ४३ अंशावर जाण्याची शक्यता आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Americaअमेरिका