शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
4
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
5
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
6
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
7
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
8
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
9
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
10
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
11
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
12
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
13
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
14
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
15
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
16
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
17
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
18
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
19
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
20
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
Daily Top 2Weekly Top 5

दुबईच्या राजकुमारीची बिझनेस 'आयडिया'! पतीला दिला तलाक अन् लॉन्च केला Divorce परफ्यूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 15:31 IST

Dubai princess perfume Divorce : इन्स्टाग्रावर पोस्ट लिहून पतीला तलाक देणाऱ्या दुबईच्या राजकुमारीने नवीन परफ्यूम लॉन्च केला. या परफ्यूमचे नाव राजकुमारी शेखा महरा यांनी 'डिव्होर्स' असे ठेवले आहे. 

Sheikha Mahra Divorce perfume : चित्रपटात किंवा तुमच्या आजूबाजूला ब्रेकअप आणि घटस्फोट झाल्यानंतर लोक काय काय करतात, हे तुम्ही कधीतरी अनुभवले असेल. प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी बरेच पराक्रम करतात. पण, दुबईचे राजे मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या मुलीने म्हणजे राजकुमारी शेखा महराने एक भन्नाट गोष्ट केली. ती आहे परफ्यूमबद्दल!

दुबईची राजकुमारी शेखा महरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. दुबईच्या राजकुमारीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून पतीला तलाक दिला होता. त्यानंतर शेखा महराने नवी पोस्ट केली आहे. ही पोस्ट नवीन परफ्यूमबद्दल आहे. या परफ्यूमच्या नावानेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

दुबईच्या राजकुमारीचा 'डिव्होर्स परफ्यूम'

राजकुमारी शेखा महराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. राजकुमारीने एक फोटो शेअर केला आहे. परफ्यूमचा फोटो असून, 'डिव्होर्स बाय महरा एम १' असे पोस्टमध्ये म्हटले आहे. गडद काळ्या रंगाची डिव्होर्स परफ्यूम बॉटल असून, हे नाव वाचून अनेक मजेशीर प्रतिक्रिया लोक पोस्ट करत आहेत.

एक यूजरने म्हटले आहे की, या परफ्यूममध्ये स्वातंत्र्याचा सुगंध असेल, असे विश्वासाने सांगू शकतो. तर दुसऱ्या यूजरने म्हटले आहे, काय क्रिएटिव्हीटी आहे. ही पोस्ट बघून तुमच्या घटस्फोटित पतीचा तिळपापड झाला असेल. अशा आशयाच्या कमेंट या पोस्ट लोक करत आहेत. 

दुबईच्या राजकुमारीचा वर्षभरातच घटस्फोट

शेखा महरा यांनी सोशल मीडियावरून तलाक दिल्याच्या घटनेने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लोकांना तलाक देण्याच्या पद्धतीचे अनेकांनी समर्थन केले होते. शेखा महरा यांनी तलाक देतानाच पतीला अनफॉलो केले. इतकेच नाही, तर पतीसोबतच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या होत्या. एका वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगी आहे. 

टॅग्स :DubaiदुबईInternationalआंतरराष्ट्रीयbusinessव्यवसाय