शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुहेत अडकलेले फुटबॉल खेळाडू अजूनही जिवंत असल्याची शक्यता, तपास सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 13:48 IST

गुहेमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी पंपही लावण्यात आले आहेत. सतत चार दिवस पाऊस पडत असल्यामुळे या प्रयत्नांमध्ये अडथळा येत आहे.

बँकॉक- थायलंडची युवा फुटबॉल टीम अजूनही गुहेमध्येच अडकून पडलेली आहे. गेले तीन दिवस हा संघ एका गुहेमध्ये अडकून पडलेला आहे. हे खेळाडू आणि त्यांचा प्रशिक्षक अजूनही जिवंत असावेत अशी आशा थायलंडच्या उपपंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

हे  सर्व खेळाडू 11 ते 16 वयाचे असून शनिवारी त्यांनी चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये प्रवेश केला होता. मंगळवारी नौदलाच्या पाणबुड्यांनी या मुलांचा पुन्हा शोध सुरु केला आहे. गुहेमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी पंपही लावण्यात आले आहेत. सतत चार दिवस पाऊस पडत असल्यामुळे या प्रयत्नांमध्ये अडथळा येत आहे. ही मुले जिवंत सापडतील. त्यांच्याकडे खायला काहीही नसले तरी पिण्यासाठी पाणी आहे अशा शब्दांमध्ये थायलंडच्या उपपंतप्रधानांनी आशा व्यक्त केली आहे. नौदलाचे 17 पाणबुडे त्यांचा शोध घेत आहेत. या खेळाडूंच्या नातलगांनी गुहेच्या बाहेर गर्दी केली असून खेळाडूंच्या संरक्षणासाठी प्रार्थना सुरु केली आहे.

चियांग राय प्रांतामध्ये थाम लुआंग नँग नोन नावाच्या गुहेमध्ये खेळाडू व प्रशिक्षक गेले होते. जोरदार पावसामुळे गुहेच्या द्वाराजवळ पाण्याचा वेगवान प्रवाह वाहात आहे. त्यामुळे ते सर्व आत अडकून पडले. ही गुहा पाहाण्यासाठी शेकडो लोक येत असतात. जमिनीखाली अनेक किलोमिटरचे जाळे असणारी गुहा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.

या गुहेत जाण्यासाठी पाण्याचा लहानसा प्रवाह ओलांडावा लागतो असे बँकॉक पोस्ट या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. मात्र पावसाळ्यात याच प्रवाहामुळे गुहेत जाणे अशक्य होते. पावसाळ्याचे जून ते ऑक्टोबर हे पाच महिने या प्रवाहाला पूर आला तर पाच मीटर्स म्हणजे 16 फूट पाणी गुहेत साचू शकते असे पोलीस कर्नल कोम्सान सार्दलुआन यांनी सांगितले.

 

टॅग्स :ThailandथायलंडFootballफुटबॉलInternationalआंतरराष्ट्रीय