शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हाफिज सईदचा खास मित्र ईदच्या दिवशी ठार; कराचीमध्ये अज्ञाताने झाडल्या गोळ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:48 IST

Hafiz Saeed Close Aide Murder: ठार झालेला अब्दुल रहमान लष्कर-ए-तैयबाचा फायनान्सर होता. पाहा गोळीबाराचा धक्कादायक व्हिडिओ...

Hafiz Saeed Close Aide Murder: गेल्या काही काळापासून पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या अनेक दहशतवाद्यांचा एकामागून एक खात्मा करण्यात आला आहे. आता भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या जवळच्या मित्राची कराचीत हत्या करण्यात आली. लष्कर-ए-तैयबासाठी निधी जमा करणाऱ्या अब्दुल रहमानवर कराचीमध्ये अज्ञातांनी गोळीबार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.

हल्ल्यात अब्दुल रहमानचे वडीलही जखमीअब्दुल रहमान हा अहल-ए-सुन्नत वाल जमातचा स्थानिक नेता असल्याचे सांगण्यात येत आहे. तो कराचीत लष्करसाठी निधी गोळा करायचा. त्याचे एजंट सर्व भागातून निधी आणायचे आणि त्याच्याकडे जमा करायचे, त्यानंतर तो हाफिज सईदला निधी पोहोचवत असे. गोळीबारात अब्दुल रहमानचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या वडिलांसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

क्वेट्टा येथे मुफ्ती यांची गोळ्या झाडून हत्यागेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाने त्रस्त आहे. एकीकडे बीएलए आणि तेहरीक-ए-तालिबान बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराला टार्गेट करत आहेत. तर दुसरीकडे एकामागून एक दहशतवादी मारले जाताहेत. अलीकडेच जमियत-उलेमा-ए-इस्लामचे मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई याची क्वेट्टा येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. क्वेटा विमानतळाजवळ नूरझाई याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. 

लष्कराचा टॉप कमांडर मारला गेलाअब्दुल रहमानच्या आधी लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर झिया-उर-रहमान उर्फ ​​नदीम उर्फ ​​कटल सिंधी याची पंजाब प्रांतातील झेलम भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नदीम हा लष्कराचा संस्थापक हाफिज सईदचा विश्वासू सहकारी मानला जात होता. जम्मू-काश्मीरमधील पुंछ-राजौरी भागात दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानhafiz saedहाफीज सईदterroristदहशतवादी