शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

म्युझिकल कॉन्सर्टवर दहशतवादी हल्ला, 19 जणांचा मृत्यू

By admin | Updated: May 23, 2017 07:16 IST

इंग्लडमधील मँचेस्टरमध्ये सुरु असलेल्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा अधीक जण जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 23 - इंग्लडमधील मँचेस्टरमध्ये सुरु असलेल्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा अधीक जण जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या घटनास्थळावर अनेक रुग्णवाहिका आल्या असून जखमींना सुरक्षित रुग्णालयात नेण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे समजते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सर्व परिसरात तपासणी सुरु केली असून जागोजागी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

अमेरिकन गायिका अरियाना ग्रँण्डचा म्युझिकल कॉन्सर्ट होणार होता. या कार्यक्रमाला 21 हजार प्रेक्षक येण्याची शक्यता होती. माध्यमांच्या वृत्तानुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. कार्यक्रम स्थळापासून जवळच राहणाऱ्या सूजी मिशेलने सांगितले की, कार्यक्रमाच्या समोरच्या बाजूला मी राहते. भीषण स्फोटाच्या आवाजानंतर मी बाहेर आले. मोठ्य़ा संखेने रस्त्यावर लोक इकडे-तिकडे धावत होते. 

म्युझिकल कॉन्सर्टमध्ये भाग घेतलेल्या एकाने स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, स्फोटानंतर सर्वजण मोठ-मोठ्याने ओरडत धावत होते. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. स्फोटाचा परिसर धूराने व्यपला होता आणि विचित्र असा जळण्याचा वास येत होता. बॉम्बस्फोटानंतर मँचेस्टर विक्टोरिया स्टेशन वरुन जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.