शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 09:02 IST

  व्यापार व संपर्कापूर्वी प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इस्लामाबाद येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २३व्या शिखर संमेलनाला संबोधित करताना बुधवारी जयशंकर बोलत होते. 

इस्लामाबाद : जर सीमेपलीकडील हालचाली दहशतवाद, अतिरेकवाद व फुटीरतावाद या तीन वाईट कृत्यांवर आधारित असतील तर व्यापार, ऊर्जा आणि संपर्क क्षेत्रात सहकार्य वाढण्याची शक्यता धूसर होते, असे नमूद करत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवाद्याच्या मुद्द्यावर  पाकला खडेबोल सुनावले. 

  व्यापार व संपर्कापूर्वी प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इस्लामाबाद येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २३व्या शिखर संमेलनाला संबोधित करताना बुधवारी जयशंकर बोलत होते. 

कुठलेही सहकार्य हे परस्पर आदर व सार्वभौमत्वाच्या समानतेवर आधारित असले पाहिजे. एससीओच्या प्रत्येक सदस्य राष्ट्राने समूहाच्या प्रत्येक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. शांघाय सहकार्य संघटनेची(एससीओ) व्याप्ती वाढण्याची गरज पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी व्यक्त केली.   

परस्पर विश्वास, मैत्री आणि चांगले शेजारी असावेत- परस्पर विश्वास, मैत्री आणि चांगले शेजारी असण्याच्या भावनेला बळकटी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.- क्षेत्रीय सहकार्यावर बोलताना दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत जयशंकर यांनी दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकची चांगलीच कानउघडणी केली.- पाकला खडेबोल सुनावतानाच पूर्व लडाखमधील भारत व  चीनच्या लष्करामधील तणाव, हिंद महासागर व इतर धोरणात्मक जलक्षेत्रात चीनच्या वाढत्या शक्तीचा मुद्दा उपस्थित करत जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली.- या शिखर संमेलनाचे अध्यक्ष व पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे उद्घाटनाचे भाषण झाल्यानंतर लगेच जयशंकर यांनी संबोधित केले. 

चीनच्या योजनेला भारताचा विरोधचचीनच्या वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) या योजनेला पाठिंबा देण्यास भारताने पुन्हा एकदा नकार दिला आहे. त्यामुळे या योजनेला पाठिंबा न देणारा भारत हा एससीओमधील एकमेव देश ठरला आहे. 

ओबीओआर ही योजना चीन-पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून ओबीओआरचा मार्ग जाणार आहे. या गोष्टी व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन भारताने या योजनेला बुधवारी विरोध केला..

एससीओचा उद्देश...संतुलित विकास, एकात्मता व संघर्ष रोखण्यासाठी सकारात्मक शक्ती बनण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून प्रादेशिक स्वरूपाचे बहुआयामी सहकार्य विकसित करणे, हादेखील संघटनेचा उद्देश आहे. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तान