शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अमेरिकेच्या टायफॉन लाँचर्सची दहशत; चीननं बाह्या सरसावल्या, उचललं उचललं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 15:47 IST

फेब्रुवारी २०२५ मध्ये पब्लिश झालेल्या या हवालात म्हणण्यात आले आहे की, अशा प्रकारची पाणबुडी तयार करण्याचा उद्देश, प्रदेशात वाढणाऱ्या परदेशी उपस्थितीचा सामना करणे आणि नौदलाची क्षमता वाढविणे, असा आहे. महत्वाचे म्हणजे, फिलीपिन्सच्या लुझोन बेटावर अमेरिकेने तैनात केलेल्या टायफॉन लाँचर्सचा विचार करता, हा निर्णय घेण्यात आला आहे.

चीनच्या वुहान प्रांतात एक विशेष पाणबुडी तयार करण्यात येत आहे. एका निमशासकीय लष्करी मासिकाने यासंदर्भात माहिती दिली आहे. या मासिकानुसार, या पाणबुडीचा वापर फिलीपीन्समध्ये तैनात एका मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र, पीपल्स लिबरेशन आर्मीकडून यासंदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत पुष्टी करण्यता आलेली नाही.  अमेरिकेच्या टायफॉन लाँचर्सचा सामना करण्यासाठी घेण्यात आला निर्णय -'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, चीन स्टेट शिपबिल्डिंग कॉरपोरेशनची मालकी असलेल्या नेवल अँड मर्चंन्ट शिप्सच्या अहवालात या पाणबुडीचे डिझाइन, तिची क्षमता आणि तिचे अस्तित्व यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये पब्लिश झालेल्या या हवालात म्हणण्यात आले आहे की, अशा प्रकारची पाणबुडी तयार करण्याचा उद्देश, प्रदेशात वाढणाऱ्या परदेशी उपस्थितीचा सामना करणे आणि नौदलाची क्षमता वाढविणे, असा आहे. महत्वाचे म्हणजे, फिलीपिन्सच्या लुझोन बेटावर अमेरिकेने तैनात केलेल्या टायफॉन लाँचर्सचा विचार करता, हा निर्णय घेण्यात आला आहे. टाइफॉन लाँचर्स लुझोन बेटावरून थेट रशिया, चीन, आणि नॉर्थ कोरियावरही स्ट्राइक करू शकते.

हिच्या सहाय्याने PLA शत्रूवर गुप्तपणेही हल्ला करू शकते -अहवालानुसार, ही पाणबुडी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हिच्या सहाय्याने PLA आपल्या शत्रूवर गुप्तपणे हल्ला करू शकते. तसेच आवश्यकता भासल्यास या हिच्यावर अण्वस्त्रे देखील तैनात केजी जाऊ शकतात. याशिवाय, ही पाणबुडी इतर सैन्य दलांसह समन्वय साधून शत्रू देशांकडून होणाऱ्या हल्ल्यांपासूनही वाचवू शकते. तसेच, एकट्या अथवा छोट्या-छोट्या समूहांमध्ये तैनात असलेल्या शत्रूलाही सळो की पळो करू शकते.

अशी आहे खासियत - या पाणबुडीत विविध प्रकारच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ज्यात क्षेपणास्त्रांसाठी व्हर्टिकल लाँच सिस्टम (VLS), क्रूझ, अँटी-शिप बॅलिस्टिक व्हेरिअंट्स आणि सुरक्षिततेसाठी X आकाराचे टेल फिन आहे. तसेच, युद्धादरम्यान, ही पाणबुडी मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाUSअमेरिकाXi Jinpingशी जिनपिंगDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प