शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

पाकिस्तानकडून RSS चा हिंसक राष्ट्रवादी संघटना म्हणून उल्लेख; UNSC मध्ये केली बंदी घालण्याची मागणी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 14, 2021 13:46 IST

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकाच्या मुद्द्यावर भाष्य नाही, पाकिस्तानकडून पुन्हा एकदा काश्मीरचा उल्लेख

ठळक मुद्देपाकिस्तानकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंसक राष्ट्रवादी संघटना म्हणून उल्लेखपुन्हा एकदा पाकिस्तानकडून UNSC च्या व्यासपीठाचा भारत विरोधी प्रचारासाठी वापर

पाकिस्ताननं पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठाचा उपयोग भारतविरोधी प्राचारासाठी आणि बेजबाबदार व्यक्तव्यांसाठी केला आहे. संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठावरून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली. इतकंच नाही तर पाकिस्ताननं भाजपा आणि काश्मीरबाबतही संयुक्त राष्ट्रांत अनेक खोटी वक्तव्य केली. संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानचे राजदूत मुनिर अकरम यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जगभरातील हिंसक राष्ट्रवादी संघटनांना दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली. तसंच त्यांनी आपल्या भाषणादरम्यान भाजपा आणि हिंदू-मुस्लीम यावरही भाष्य केलं. दरम्यान, त्यांनी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारावर आणि त्यांच्या परिस्थितीवर कोणतंही भाष्य केलं नाही. "भाजपा ही हिंदुत्वाची विचारधारा मानते. भाजपाकडून आपल्या देशातील मुस्लिमांना धमक्याही देण्यात येतात," असं वक्तव्यही मुनीर अकरम यांनी यावेळी केलं. तसंच हिंसक राष्ट्रावादाचा उदय रोखण्यासाठी पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत यावेळी सूचनाही केल्या. पाकिस्ताननं आपल्या सूचनांमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे सर्व राष्ट्रांनी आपल्या देशातील हिंसक राष्ट्रवादी संघटनांना दहशतवागी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी केली. तसंच या संघटनांच्या विचारधारा, त्यात होणारी भरती आणि आर्थिक मदतीवरही तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसंच यावेळी पाकिस्तानकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही उल्लेख करण्यात आला. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रवाही हिंसक समुहांमध्ये सामील करण्यासाठी १२६७ प्रतिबंध समितीचा विस्तार करायला हवा," असंही अकरम म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या देशातील दहशतवाद सोडून अन्य सर्व विषयांवर भाष्य केलं. पुन्हा काश्मीरचा मुद्दासंयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानचे राजदूत इतक्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याप्रमाणेत पुन्हा काश्मीरच्या मुद्द्वार भाष्य करत लष्करावरही खोटे आरोप केले. भारतीय लष्करच काश्मीरमध्ये भीती निर्माण करण्याचं काम करत आहे. तसंच लष्कर पाकिस्तानात मानवताविरोधी गुन्हे करत असल्याचंही बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केलं.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघPakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ