शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादामुळे जग लोटले गेले संकटाच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 06:06 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज : अनेकांची आयुष्ये झाली उद््ध्वस्त, विविध प्रदेशांत अस्थैर्य

अबु धाबी : दहशतवादामुळे अनेकांची आयुष्ये उद््ध्वस्त होत असून त्यामुळे विविध प्रदेशांत अस्थैर्य निर्माण झाले आहे. या गोष्टींमुळे जग संकटाच्या खाईत लोटले जात आहे असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी) ही ५७ मुस्लीम देशांची संघटना असून त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद््घाटन सोहळ््याला प्रमुख पाहुणा म्हणून भारताला प्रथमच निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत सुषमा स्वराज यांनी आपल्या सतरा मिनिटांच्या भाषणात सांगितले की, दहशतवादाविरुद्ध सुरू केलेली लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही.

काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मदने घडविलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज म्हणाल्या की, मुलतत्ववादी व धर्मांध विचारसरणीला भारतातले खूपच कमी मुस्लीम बांधव बळी पडतात. विविध गोष्टींच्या नावाखाली दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. या घातपाती कारवाया जिथे होतात त्या प्रदेशाचेच अंतिमत: मोठे नुकसान होत असते. (वृत्तसंस्था)पाकिस्तानचा बहिष्कारभारताने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई हल्ले चढविले होते. या कृतीच्या निषेधार्थ भारताला ओआयसीच्या परिषदेसाठी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्यासाठी दिलेले निमंत्रण रद्द करावे अशी मागणी पाकिस्तानने आयोजकांकडे केली होती. पण त्याकडे कोणीही ढुंकून न पाहिल्याने पाकिस्तानने या परिषदेवर बहिष्कार घातला आहे. यासंदर्भात त्या देशाचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले की, भारताला आमंत्रित करण्याबाबत ओआयसीने पाकिस्तानशी सल्लामसलत केली नव्हती. भारत या संघटनेचा सदस्य किंवा निरीक्षकही नाही तरीही का बोलाविण्यात आले?

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज