शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
4
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
5
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
6
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
7
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
8
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
9
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
10
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
11
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
12
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
13
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
14
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
15
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
16
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
17
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
18
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
19
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
20
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशमधील रस्त्यांवर पुन्हा तणाव, देशभरात रेल्वे ठप्प, लष्कराला करावं लागलं पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 08:33 IST

Bangladesh Student Protest: मागच्या काही काळापासून राजकीयदृष्ट्या अस्थिर झालेल्या  बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात रेल्वेच्या संपामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मागच्या काही काळापासून राजकीयदृष्ट्या अस्थिर झालेल्या  बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात रेल्वेच्या संपामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रेल्वे रुळांसमोर बसले असून, ते ट्रेन चालू देत नाही आहेत. या आंदोलनामुळे मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील लष्कराच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही विद्यार्थी माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे.

ढाका येथील टिटुमीर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅक अडवले आहेत. आपल्या महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा मिळावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. या विद्यार्थ्यांनी सोमवारी सुमारे ४.१५ च्या सुमारास आंदोलनास सुरुवात केली. या नाकेबंदीमुळे ढाका-टोंगी-ढाका विभागातील रेल्वेसेवा ठप्प झाली. या मार्गावर सध्या कुठलीही ट्रेन चालत नाही आहे.  हा विरोध एवढा तीव्र आहे की, अनेक ड्रायव्हर हल्ला होण्याच्या भीतीने ट्रेन चालवण्यास नकार देत आहेत.

रेल्वे पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थिती तितकीची चांगली नाही आहे. तणाव प्रचंड असल्याने ट्रेन विविध ठिकाणी थांबवण्यात आल्या आहेत. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्व होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. आंदोलकांचं नेतृत्व करत असलेल्या अली अहमद याने सांगितले की, जोपर्यंत मोहम्मद युनूस किंवा शिक्षण सल्लागार आमच्या कॉलेजला विद्यापीठ घोषित करत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत. आम्ही सर्वमान्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र सरकारने आम्हाला हे आंदोलन करण्यास भाग पाडलं आहे.

या नाकेबंदीमुळे ढाका आणि देशातील इतर भागांदरम्यान रेल्वेसेवा बाधित झाली आहे. अनेक गाड्या तेजगाव स्टेशन आणि इतर विमानतळांवर अडकून पडल्या आहेत. ट्रेनचा खोळंबा झाल्याने लोक बसचा पर्याय निवडत आहेत. मात्र तिथेही गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. शहरामध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला नवा धोका निर्माण झाला आहे.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशStudentविद्यार्थी