शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

तापमान वाढ असह्य; २०१९ दुसरे सर्वाधिक ‘उष्ण’ वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:30 IST

ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषण कारणीभूत

- सचिन लुंगसे मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत भर पडत आहे. १९९८ पासून जागतिक पातळीवर नोंदविलेल्या उष्ण वर्षांपैकी २०१६ नंतर २०१९ हे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याची नोंद नॅशनल ओशिएन अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनने केली. १९९८सह २००५, २००९, २०१०, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८ या वर्षांची उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली.नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनकडील माहितीनुसार, अल निनोसह तत्सम घटकांमुळे तापमानात उत्तरोत्तर वाढ होत आहे. मुळात जमिनीसह समुद्रावरील वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणात पडणारी भर; असे अनेक घटक वाढत्या उष्ण वर्षांस कारणीभूत आहेत. नॅशनल ओशिएन अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशननेही २०१९ सालच्या सात महिन्यांतील तापमानाची नोंद घेत, त्याची १८८० सालापासून आतापर्यंत म्हणजे १४० वर्षांतील माहितीसोबत तुलना केली. त्यावेळी तापमानवाढीतील फरक समोर आला.जुलैमध्ये युरोपसह ग्रीनलँड उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला. जुलैमध्ये अलास्का, पश्चिम कॅनडा, मध्य रशिया येथील तापमान हे सरासरी तापमानापेक्षा ३ अंशांनी अधिक होते. जानेवारी ते जुलै, २०१९ हा काळ तिसरा उष्ण काळ ठरला. दरम्यान, जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाता कामा नये, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.जागतिक पातळीवरील गेल्या शंभर वर्षांतील उष्ण वर्षे (अंश सेल्सिअसमध्ये)वर्षे       तापमानवाढ२०१५       ०.५९२०१७       ०.७१२०१०        ०.८२२००९       ०.८५२०१६       ०.८७जुलै महिना सर्वांत उष्णजुलै २०१९ महिन्यात जगभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानामुळे २०१९ मध्ये जुलै महिना पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण महिना ठरला.१९ जुलै, २०१९ रोजी सांताक्रुझ वेधशाळेत कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सर्वसाधारण कमाल तापमानाच्या तुलनेत ते ६ अंशाने अधिक होते. जुलैमधील महिन्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमाल तापमान होते. २२ जुलै, १९६० रोजी ३४.८ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली होती.

टॅग्स :Temperatureतापमान