शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

भुकंपानंतर १२० तासांनी किशोरवयीन मुलाची झाली सुटका

By admin | Updated: May 1, 2015 01:53 IST

नेपाळला भूकंपाचा भीषण धक्का बसला त्याला आता पाच दिवस उलटले आहेत. आपत्तीशी झगडणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी घटना गुरुवारी घडली

काठमांडू : नेपाळला भूकंपाचा भीषण धक्का बसला त्याला आता पाच दिवस उलटले आहेत. आपत्तीशी झगडणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी घटना गुरुवारी घडली असून, १२० तास ढिगाऱ्याखालील किशोरवयीन मुलाची सुखरूप सुटका हा एक चमत्कारच मानावा लागेल. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय येण्याचीच ही वेळ. काठमांडू शहरात गुरुवारी असाच चमत्कार घडला. १५ वर्षांच्या मुलाला पाच दिवसांनंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, संध्याकाळी ३० वर्षीय महिलेचीही बचावदलाने सुटका केली.पेम्बा लामा असे या मुलाचे नाव आहे. शनिवारचा भीषण भूकंप झाला तेव्हाच कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तो गाडला गेला; पण इमारतीचे दोन खांब एकमेकांवर पडले व मधल्या पोकळीत पेमा लांबा असल्याने त्याच्यासाठी हवेची पोकळी तयार झाली. त्याच्या रडण्याचा अगदी मंद असा आवाज कानावर पडल्यानंतर अमेरिकन व नेपाळी पथकाने त्याची सुटका केली. पेम्बाची सुटका होताच घटनास्थळी जमलेल्या मोठ्या जमावात आनंदाची लहर फिरली. सात मजली गेस्ट हाऊसच्या ढिगाऱ्याखालून पाच दिवसांनी हा मुलगा जिवंत बाहेर पडला.या घटनेने नेपाळमधील भूकंपपीडितांच्या मनात एक आशेचा किरण फुलला.पाकने पाठविला बीफ मसाला४काठमांडू : नेपाळमधील भूकंपानंतर, तेथील हजारो लोक भुकेले असून, अन्नाची वाट पाहत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी पाकिस्ताननेही दोन विमाने पाठविली; पण त्यातून आलेल्या अन्नपपदार्थात बीफ मसाल्याची पाकिटे असल्याने धक्का बसलेल्या लोकांनी या पाकिटांना स्पर्शही केला नाही. भारताप्रमाणेच नेपाळमध्ये गाय पवित्र समजली जाते. ४गाईस मारण्यास तिथे बंदी असून, या गुन्ह्यासाठी १२ वर्षांची शिक्षा आहे. नेपाळमध्ये बीफ मसाला पाठविणे ही काही जणांच्या मते असंवेदनशीलता तर काही जणांच्या मते पाकने केलेली ही क्रूर थट्टा आहे. ‘डेली मेल’मध्ये आलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या या मदतीतील अन्नाची पाकिटे कशाची आहेत हे प्रथम भारतीय डॉक्टरांनी पाहिले व नंतर अधिकाऱ्यांना सांगितले.दहशतवादी भारतात घुसण्याचा धोका४नवी दिल्ली : नेपाळमधील भीषण भूकंपानंतर नेपाळ-भारत सीमा दहशतवाद्यांसाठी धोकादायक झाली असून, भूकंपबळींच्या वेशात दहशतवादी भारतात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारत- नेपाळ सीमेवर सध्या गोंधळाचे वातावरण आहे. त्याचा फायदा घेऊन दहशतवादी हल्ला करण्याच्या दृष्टीने अनेक दहशतवादी संघटना आपले सदस्य भारतात घुसविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. ४हा धोका लक्षात घेऊन गुप्तचर संघटना आयबीने एक निवेदन प्रसिद्ध केले असून उत्तर प्रदेश सरकारला अलर्ट केले आहे. उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवर असणाऱ्या महाराजगंज, सिद्धार्थनगर, बलरामपूर, श्रावस्ती, बहारिच, लखीमपूर खेरी व पिलिभीत या शहरांच्या सीमेवर गस्त वाढवावी असे आयबीने या निवेदनात म्हटले आहे.४नेपाळमधील भूकंपबळींची संख्या १५ हजारांवर जाण्याची भीती नेपाळच्या सैन्यप्रमुखांनी गुरुवारी व्यक्त केली. आतापर्यंत सुमारे ६,००० हजार मृतदेह सापडले असून, ११ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. अद्याप अनेक भागांत मदत आणि बचाव पथके पोहोचायची आहेत.४नेपाळचे सैन्यप्रमुख जनरल गौरव राणा यांनी सांगितले की, आमच्या अंदाजानुसार भूकंपबळींची संख्या १० ते १५ हजारांदरम्यान राहील. मदत न पोहोचल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. याची आम्हाला जाणीव असून भूकंपोत्तर आजारांचा प्रादुर्भाव रोखणे हा आमच्या अजेंड्यावरील मुख्य मुद्दा आहे. तत्पूर्वी, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी भूकंपबळींची संख्या १० हजारांवर जाण्याची भीती व्यक्त केली होती.