शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

या मैत्रीसाठी थ्री चिअर्स; 2 वर्ष पैसे साठवून मित्रासाठी खरेदी केली इलेक्ट्रिक व्हिलचेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 17:37 IST

दोघांच्या मैत्राची सोशल मीडियावर चर्चा

न्यूयॉर्क: अमेरिकेच्या अर्कान्सस राज्यात शिकणाऱ्या दोन मित्रांची गोष्ट सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरली आहे. मैत्री किती घट्ट असू शकते, त्यामुळे एखाद्याचं आयुष्य कसं आणि किती बदलू शकतं, हे यातून दिसून आलं आहे. कॅड्डो हिल्स हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या टॅनर व्हिल्सन आणि ब्रँडन क्वॉल्स यांच्या मैत्रीची चर्चा जगभरात सुरू आहे. आपल्या मित्राला दररोजच्या आयुष्यात होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी टॅनरनं केलेली कृती अनेकांच्या हृदयाला भिडली.टॅनरचा मित्र ब्रँडन दिव्यांग आहे. तो व्हिलचेअर वापरतो. ही व्हिलचेअर खूप जुनी असल्यानं ती ब्रँडनला ढकलावी लागायची. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना, मैदानातून वर्गात येताना, स्वच्छतागृहात जात असताना ब्रँडनला बरेच कष्ट घ्यावे लागतात, ही गोष्ट टॅनरच्या लक्षात आली. यामुळे ब्रँडनचे हात खूप दुखतात. त्याला वेदना होतात, हे टॅनरच्या संवेदनशील मनाला जाणवलं. आपल्या मित्राचा हा त्रास दूर व्हायला हवा, असं त्याला वाटलं. मग त्यानं त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले. ब्रँडनसाठी इलेक्ट्रिक व्हिलचेअर खरेदी करायची, असं टॅनरनं मनोमन ठरवलं. त्यासाठी त्यानं एका कार मॅकेनिककडे पार्ट टाईम नोकरी करण्यास सुरुवात केली. जवळपास दोन वर्षे ब्रँडननं गॅरेजमध्ये काम केल्याचं त्याची आई कॉलेन कॅरमॅकनं सीएनएनशी बोलताना सांगितलं. पुरेसे पैसे जमा झाल्यावर टॅनरनं मित्रासाठी इलेक्ट्रिक व्हिलचेअर खरेदी केली. ब्रँडन वर्गात येताच टॅनरनं स्वकमाईतून खरेदी केलेली इलेक्ट्रिक व्हिलचेअर त्याच्यासमोर आणली. टॅनरनं दिलेलं हे गिफ्ट पाहून ब्रँडन निशब्द झालं. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. 'त्यानं माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट केली. माझा खरंच माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही,' अशी भावना ब्रँडननं व्यक्त केली. 'आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हिलचेअर असावी, असं माझं स्वप्न होतं. ते टॅनरमुळे सत्यात उतरलं,' असंदेखील तो पुढे म्हणाला. मित्राच्या डोळ्यातले अश्रू पाहून टॅनरदेखील गलबलला. तो माझा खूप जवळचा मित्र आहे. तो कायम माझ्यासोबत असतो. त्यामुळे त्याला ही भेट द्यावीशी वाटली, अशी भावना टॅनरनं व्यक्त केली. ब्रँडन आणि टॅनरच्या मैत्रीची कहाणी आता जगभरात पोहोचली आहे. फेसबुकवर त्यांच्या मैत्रीशी संबंधित पोस्टला शेकडो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. कॅड्डो हिल्स हायस्कूलनं ही पोस्ट प्रसिद्ध केली आहे. याशिवाय त्यांनी या दोघांचा व्हिडीओदेखील प्रसिद्ध केला आहे. 

टॅग्स :USअमेरिका