ऑनलाइन लोकमतकाराकास, दि. 2 - व्हेनेझुएलातील समाजवादी राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सुरक्षा दलाने हजारो आंदोलनकर्त्यांवर सोमवारी अश्रुधुराचा मारा केला. निकोलस मदुरो यांच्या दमनकारी नीतीविरुद्ध व्हेनेझुएलात प्रचंड अंसतोष असून, सोमवारी मे डे निमित्त केल्या गेलेल्या आंदोलनात काही ठिकाणी आंदोलक उग्र झाले व त्यांनी दगडफेक केली. गत महिन्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनात २९ जण ठार झाले असून, शेकडो जण जखमी झाले आहेत.
आंदोलनकर्त्यांवर अश्रुधुराचा मारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2017 05:49 IST