शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात नशीब! पत्नी ठरली लकी, टॅक्सी ड्रायव्हर झाला करोडपती; मिळाले 2 कोटी 80 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:27 IST

टॅक्सी ड्रायव्हरचं नशीब रातोरात बदलल्याची घटना समोर आली आहे. एका झटक्यात तो करोडपती झाला आहे.

टॅक्सी ड्रायव्हरचं नशीब रातोरात बदलल्याची घटना समोर आली आहे. एका झटक्यात तो करोडपती झाला आहे. लॉटरी लागली असून त्याने तब्बल 2 कोटी 80 लाख रुपये जिंकले आहेत. टॅक्सी ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, तो कोट्यधीश झाला मात्र त्यामागे त्याच्या दिवंगत पत्नीचा मोठा वाटा आहे. त्याने पत्नीच्या वयाच्या नंबरचा उपयोग करून लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. 

TheThaiger च्या रिपोर्ट्सनुसार, थायलंडच्या बँकॉकमध्ये ही घटना घडली आहे. एका टॅक्सी चालकाला 2 कोटी 80 लाखांची लॉटरी लागली. त्या व्यक्तीने आपली ओळख उघड केलेली नाही आणि सांगितले की, या पैशांचा वापर तो पूर्वीचे कर्ज फेडण्यासाठी आणि आपल्या मुलीच्या चांगल्या आयुष्यासाठी करणार आहे. 

टॅक्सी ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. लॉटरी घेताना त्याने पत्नीच्या वयाच्या नंबरचा वापर करून लॉटरीची दोन तिकीटं खरेदी केली. दोन्ही तिकीट एकाच नंबरचे होते. नशिबाने त्याला लॉटरी लागली आणि त्याने तब्बल 12 मिलियन Bath म्हणजेच दोन कोटी 80 लाख रुपये जिंकले. 

लॉटरी जिंकल्यानंतर, व्यक्तीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्याने आपल्या मुलीला मिठी मारली. याचे काही फोटो हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. जेव्हा लोकांनी त्याला विचारले की पैसे मिळाल्यावर तो नोकरी सोडणार का? तर त्याने आता त्याबाबत काहीही विचार केला नसल्याचं त्याने सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पहिली बेटी, धनाची पेटी! सकाळी मुलगी जन्मली, संध्याकाळी आई 80 लाखांची मालकीण झाली

कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. एका महिलेने सकाळी मुलीला जन्म दिला आणि संध्याकाळी ती तब्बल 80 लाखांची मालकीण झाल्याची घटना घडली आहे. माझ्या मुलीमुळे माझं नशीब फळफळलं, ती आमच्यासाठी लकी चार्म ठरली. त्यामुळे मी तिची खूप आभारी आहे असं महिलेने म्हटलं आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलीनामध्ये राहणाऱ्या महिलेचं नाव ब्रेंडा असं आहे. 9 नोव्हेंबरला तिने सकाळी एका गोड मुलीला जन्म दिला आणि संध्याकाळी तिला लॉटरी लागली. बक्षीस म्हणून तिने जवळपास 80 लाख जिंकले आहेत. 

टॅग्स :Thailandथायलंड