शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळताय!’, ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये तुफान खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 00:13 IST

Donald trump and Vladimir zelensky: आज डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीवेळी युद्धविराम हाच प्रमुख मुद्दा राहिला. मात्र यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचं वृत्त आहे. 

जवळपास तीन वर्षे पूर्ण झाली तरी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबलेलं नाही. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर हे युद्ध संपुष्टात आणण्याच्या दिशेने निर्णायक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहेत. त्यात आज डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीवेळी युद्धविराम हाच प्रमुख मुद्दा राहिला. मात्र यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचं वृत्त आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना हे युद्ध चुकीच्या दिशेने जात आहे. युक्रेनने रशियासोबत युद्धविराम घोषित करण्याची तडजोड केली पाहिजे, असे स्पष्ट शब्दात सांगितले. मात्र झेलेन्स्की यांनीही आक्रमक पवित्रा घेत युद्धविरामाच्या प्रस्तावाचा तीव्र शब्दात विरोध केला. तसेच रशियासोबत कुठलीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट केले. यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकही झाली. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला झेलेन्स्की यांनी विरोध केला. त्यांनी सांगितले की, आम्हाला केवळ युद्धविरामाची आवश्यकता नाही आहे. आम्ही आधीही असं केलं आहे. मात्र व्लादिमीर पुतीन यांनी २५ वेळा याचं उल्लंघन केलं आहे. त्यात तुम्ही राष्ट्राध्यक्ष असतानाही, असा प्रकार घडला होता, असे झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना सुनावले. 

यावेळी झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांना युक्रेनच्या दौऱ्यावर येण्याचं निमंत्रण दिलं. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आता तुमच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार  खेळत आहात, असे झेलेन्स्की यांना सुनावले. दरम्यान, या भेटीवेळी युद्धविरामाच्या चर्चेचा भाग म्हणून अमेरिकेसाठी युक्रेनमधील खनिज कराराबाबतही चर्चा झाली.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प