शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

टॅरिफ वॉर आणखी भडकणार...! अंड्यांपासून, सोयाबीनपर्यंत 'या' वस्तू महागणार; ट्रम्प यांच्या विरोधात 27 देशांची 'वज्रमूठ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 10:07 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला चीन आणि भारतासह सुमारे ६० देशांवर अतिरिक्त सीमाशुल्क लादण्याची घोषणा केली होती. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर ३४ टक्के अतिरिक्त शुल्क लादले आहे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरनंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. यानंतर आता जगातील अनेक देशांनी अमेरिकेला जशास-तसे उत्तर द्यायचीही तयारी सुरू केली आहे. यातच, EU अर्थात युरोपियन युनियनने काही अमेरिकन वस्तूंवर काउंटर टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे वृत्त आहे. या प्रस्तावावर ९  एप्रिलला EU चे सदस्य देश मतदान करतील. हा प्रस्ताव स्वीकारला गेला, तर टॅरिफ १५ एप्रिलपासून प्रभावित होईल. मात्र अधिकांश शुल्क मे आणि डिसेंबरपासून वसूल केले जाईल. 

या वस्तू महागणार -रॉयटर्सने दस्तएवजांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काही वस्तूंवर 16 मेपासून टॅरिफ लागू होईल. तर काही इतर वस्तूंवर याच वर्षापासून टॅरिफलागू होईल. यात, हीरे, अंडी, डेंटल फ्लॉस, पोल्ट्रीसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, काही सदस्य देशांनी आक्षेप घेतल्यानंतर या यादीतून काही वस्तू वगळण्यात आल्या आहेत. याशिवाय, बदाम आणि सोयाबीनवर डिसेंबरपासून टॅरिफ लादलेजाईल.

खरे तर, ट्रम्प यांनी युरोपीय संघाच्या मादक पेयांवर 200 टक्के काउंटर टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. यानंतर फ्रान्स आणि इटली सारख्या सदस्य देशांचे टेन्शन वाढले होते.

युरोपीय संघाने सोमवारी म्हटले आहे की, आपण ट्रेड युद्धापासून दूर राहण्यासाठी शून्य टॅरिफचा प्रस्ताव ठेवला आहे. ट्रम्प यांनी ईयूला स्टील आणि अॅल्युमिनियम तसेच कारवर 25 टक्के इम्पोर्ट टॅरिफ आणि 20 टक्के ब्रॉडर टॅरिफ लावला आहे.

ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर - डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला चीन आणि भारतासह सुमारे ६० देशांवर अतिरिक्त सीमाशुल्क लादण्याची घोषणा केली होती. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर ३४ टक्के अतिरिक्त शुल्क लादले आहे. याला प्रत्युत्तर देत चीननेही अमेरिकन आयातीवर ३४ टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली. व्यापार युद्धाच्या भीतीमुळे शेअर बाजारांमध्ये सर्वत्र घसरण दिसून येत आहे. यामुळे अमेरिकेतही आर्थिक विकास मंदावण्याची भीती आहे व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाFranceफ्रान्सItalyइटलीTrade Tariff Warटॅरिफ युद्ध