वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत अमेरिकेतील नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. नॉर्थ कॅरोलिना येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी 'टॅरिफ' (अयात शुल्क) आणि 'टॅक्स कट्स' (कर कपात) संदर्भात मोठे विधाने केले. आता टॅरिफ आपला सर्वात आवडता शब्द नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आता 'टॅरिफ' पाचव्या क्रमांकाचा आवडता शब्द - आपल्या भाषणात ट्रम्प मिश्किलपणे म्हणाले, "पूर्वी 'टॅरिफ' हा माझा सर्वात आवडता शब्द होता. मात्र, माझ्या या विधानावरून 'फेक न्यूज' वाल्यांनी माझ्यावरच प्रश्न उपस्थित केले, मग धर्माचे काय, देवाचे काय, कुटुंबाचे काय आणि पत्नी-मुलांचे काय? यामुळे आता 'टॅरिफ' माझा पाचवा आवडता शब्द आहे." यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. आपल्या बोलण्याचा विपर्यास करून दाखवले जाते. यामुळे मी आता शब्दांच्या बाबतीत अधिक सतर्क झालो आहे, असेही ट्रम्प म्हम्हणाले.
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी -नवीन वर्षात अमेरिकन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. "येत्या वर्षात अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कर कपात लागू केली जाईल," असे त्यांनी जाहीर केले आहे. यात, हॉटेल, रेस्टॉरंट आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता 'टिप्स'वर कोणताही कर भरावा लागणार नाही. तसेच, अतिरिक्त काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'ओव्हरटाइम' देखील करमुक्त केला जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा - 'सोशल सिक्युरिटी'वरही आता कुठलाही कर आकारला जाणार नाही, यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा आर्थिक आधार मिळेल.ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या या धोरणांचे 'नाट्यमय परिणाम' लवकरच दिसू लागतील. सर्वसामान्यांच्या खिशात अधिक पैसे शिल्लक राहील आणि देशाची अर्थव्यवस्थाही अधिक बळकट होईल.
Web Summary : Trump, addressing supporters, downplayed his tariff enthusiasm. He announced significant tax cuts, eliminating taxes on tips and overtime. Social Security taxes will also be eliminated, aiming to boost the economy and provide financial relief to citizens and pensioners.
Web Summary : ट्रंप ने समर्थकों को संबोधित करते हुए टैरिफ के प्रति उत्साह को कम किया। उन्होंने महत्वपूर्ण कर कटौती की घोषणा की, जिसमें टिप्स और ओवरटाइम पर करों को समाप्त कर दिया गया। सामाजिक सुरक्षा कर भी समाप्त कर दिए जाएंगे, जिसका उद्देश्य अर्थव्यवस्था को बढ़ावा देना और नागरिकों और पेंशनभोगियों को वित्तीय राहत प्रदान करना है।