शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा युक्रेन युद्ध थांबविण्याची, ट्रम्पनी गांजा बाळगल्याची शिक्षा भोगणाऱ्या शिक्षकाला रशियातून सोडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:58 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शिक्षकाचे स्वागत केले. वॉशिंग्टन आणि मॉस्कोमध्ये झालेल्या समझोत्यानुसार या शिक्षकाला सोडण्यात आले आहे.

युक्रेन युद्धावरून अमेरिका आणि रशियाचे संबंध ताणलेले असताना एक लक्षवेधक घटना घडली आहे. गांजा बाळगल्याप्रकरणी २०२१ पासून रशियाच्या तुरुंगात १४ वर्षांची शिक्षा भोगत असलेले अमेरिकन शिक्षक मार्क फोगेल यांची रशियाने तीन वर्षांतच सुटका केली आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे, ट्रम्पनी या शिक्षकाला मायदेशी आणण्यासाठी चार्टर्ड प्लेन पाठविले होते, हा शिक्षक विमानातून उतरताच त्याला थेट ट्रम्प यांच्या भेटीला व्हाईट हाऊसला नेण्यात आले. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शिक्षकाचे स्वागत केले. वॉशिंग्टन आणि मॉस्कोमध्ये झालेल्या समझोत्यानुसार या शिक्षकाला सोडण्यात आले आहे. यावेळी ट्रम्प यांनी, फोगेल यांना सोडविण्यासाठी छोटी भूमिका निभावली, यामुळे मी आनंदी आहे, असे म्हटले आहे. 

फोगेल यांना रशियन कोर्टाने २०२२ मध्ये १४ वर्षांची शिक्षा सुनावली होती. ट्रम्प प्रशासन युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियाशी चर्चा करत आहे. ही चर्चा सुरु असल्याने फोगेल यांची सुटका शक्य झाल्याचे अमेरिकेचे एनएसए माइक वॉल्ट्झ यांनी म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाचे मध्य पूर्व प्रकरणांसाठीचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे फोगेल यांना आणण्यासाठी विशेष विमानाने रशियाला गेले होते. 

कोण आहेत फोगेल...फोगेल हे काही रशियात पर्यटनाला गेले नव्हते. तर ते मॉस्कोतील एका अँग्लो अमेरिकन शाळेत इतिहासाचे शिक्षक होते. फोगेल यांच्या बॅगेतून १७ ग्रॅम गांजा सापडला होता. मॉस्को विमानतळावर त्यांना अटक करण्यात आली होती. फोगेल यांचे वाढते वय आणि आरोग्याची चिंता ही कारणे देत अमेरिकेने त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. ती रशियाने फेटाळली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे पुतीन यांचे चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. आधीच्या सरकारची मागणी रशियाने फेटाळून लावली होती, परंतू ट्रम्प येताच जादुची छडी फिरल्याप्रमाणे या शिक्षकाची सुटका झाली आहे. 

टॅग्स :russiaरशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया