शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आधी २६/११, पठाणकाेट हल्लेखोरांवर कारवाई करा; ­नवे पंतप्रधान शरीफ यांना भारत-अमेरिकेने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 06:23 IST

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काश्मीरसंबंधी केलेल्या वक्तव्याचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाचार घेतला आहे.

वाॅशिंग्टन :

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काश्मीरसंबंधी केलेल्या वक्तव्याचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाचार घेतला आहे. पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांवर तत्काळ आणि कायमस्वरूपी कारवाई करावी. भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या नियंत्रणात असलेल्या काेणत्याही भूभागाचा दहशतवादी हल्ल्यासाठी वापर व्हायला नकाे, तसेच २६/११ आणि पठाणकाेट हल्ल्यातील दाेषींना न्यायालयाच्या कक्षेत आणावे.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, त्यांनी दहशतवाद संपविण्याच्या दृष्टीने काम करावे, एवढेच मला त्यांना सांगायचे आहे. दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसाचारमुक्त वातावरणात भारताला पाकिस्तानसाेबत सामान्य संबंध हवे आहेत. तसे वातावरण निर्माण करायची जबाबदारी पाकिस्तानची आहे. अमेरिकेसाेबतच्या द्विपक्षीय चर्चेत दहशतवादावर चर्चा केल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

भारत आणि अमेरिकेत शिक्षणासह व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, डिजिटल, हवामानबदल, ऊर्जा तसेच संरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अमेरिकेतील संरक्षण कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी आमंत्रण दिले आहे. त्यातून मेक इन इंडिया माेहिमेला प्राेत्साहन मिळेल, असे ते म्हणाले.

चीनने हल्ला केल्यास अशी राहिल अमेरिकेची भूमिका- रशिया आणि युक्रेनच्या युद्धात भारताने रशियाबाबत मवाळ भूमिका घेतल्यामुळे अमेरिकेने नाराजी व्यक्त केली हाेती. चीनने हल्ला केल्यास रशिया मदतीला धावून येणार नाही, असे वक्तव्य अमेरिकेकडून करण्यात आले हाेते. मात्र, अशा स्थितीत भारताच्या सार्वभाैमत्त्वाच्या रक्षणासाठी अमेरिका उभी राहील, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लाॅयड ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. -  भारत आणि प्रशांत महासागराच्या क्षेत्रातील शेजारी राष्ट्रांच्या सार्वभाैमत्वाला चीन आव्हान देत आहे. चीन सीमेवर बांधकामे करतोय. मात्र, आम्ही तुमच्यासाेबत राहू. कारण तुम्ही तुमच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण करीत आहात, असे ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. तर चीनच्या विस्तारवादाला नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिका आणि भारतात द्विपक्षीय सहकार्य खूप महत्त्वाचे आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

भारताच्या सदस्यत्वासाठी अमेरिकेचे समर्थनसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी सदस्यत्व आणि आण्विक पुरवठादार गटात भारताचा समावेश करण्यास अमेरिकेचा पाठिंबा कायम राहणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. या गटात भारताच्या समावेशाला चीनने विराेध केला आहे. भारताने अण्वस्त्र प्रसार राेखण्याच्या करारावर हस्ताक्षर न केल्यामुळे चीनचा विराेध आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान