शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

बेड जोरात हलला अन् थरकाप उडाला, तैवानमधील भारतीय तरुणाने ‘लोकमत’ला सांगितला थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 6:31 AM

Taiwan Earthquake: तैवानला लहान-मोठ्या भूकंपांची सवय आहे. मात्र, बुधवारी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी जाणवलेला भूकंपाचा धक्का मोठा होता. खिडक्या जोरात हलल्या आणि बेड जोरजोरात हलू लागला. यामुळे झोप उडाली. उठून पाहतो तर मोठा भूकंप होत असल्याचे लक्षात आले

- कौस्तुभ महाजनीहुआलिन (तैवान) - तैवानला लहान-मोठ्या भूकंपांची सवय आहे. मात्र, बुधवारी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी जाणवलेला भूकंपाचा धक्का मोठा होता. खिडक्या जोरात हलल्या आणि बेड जोरजोरात हलू लागला. यामुळे झोप उडाली. उठून पाहतो तर मोठा भूकंप होत असल्याचे लक्षात आले अन् अंगावर काटा आला. असा भूकंप प्रथमच अनुभवत होतो.

६ वर्षांपासून तैवानमध्ये राहात असल्याने भूकंप ही येथे काही नवीन गोष्ट नाही. दर महिन्याला किमान ४ ते ५ रिक्टर स्केलचे अनेक धक्के बसत असतात. मात्र, बुधवारी सकाळी जेव्हा उठलो तेव्हा जे हादरे बसत होते तेव्हा ते प्रचंड होते. काही क्षण काय करायचे तेच कळाले नाही. सकाळी ८ ते दुपारपर्यंत अनेक लहान-मोठे धक्के जाणवत होते.

नवीन तैपेईमध्ये २४ व्या मजल्यावर मी राहतो. ७.४ रिक्टर स्केल भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू सुमारे ३५ किलोमीटर खोल होता.

...म्हणून जास्त नुकसान नाही- याआधी ६ वर्षांत येथे भूकंपाचे खूप धक्के मी अनुभवले. मात्र, हा १९९९ नंतरचा ७ रिक्टर स्केलचा भूकंप होता. त्यामुळे थरकाप उडाला.-हुआलियन शहरात अनेक घरे पडली, मात्र तैवानच्या सैन्य आणि आपत्ती प्रतिबंध विभागाने तत्काळ मदत करत लोकांचा जीव वाचवला. 

केवळ १ तासात सर्वकाही सुरूतैवानला नियमितपणे भूकंपाचा धक्का बसत असल्याने सुरक्षिततेसाठी जगातील सर्वांत प्रगत सुसज्जता येथे आहे. परंतु, बुधवारचा भूकंप इतका तीव्र होता की भूकंपांची सवय झालेले नागरिकही भयभीत झाले. लोकल ट्रेन आणि सार्वजनिक वाहतूक अवघ्या ३० ते ६० मिनिटांच्या तपासणीनंतर पुन्हा सुरू झाली. सध्या इमारतींचे नुकसान झालेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. त्यांना योग्य ती सर्व मदत केली जात आहे. 

तैवानमधील मोठे भूकंप- हुआलिनला शेवटचा भूकंपाचा धक्का २०१८ मध्ये बसला होता ज्यात १७ जण ठार झाले होते आणि एक ऐतिहासिक हॉटेल जमीनदोस्त झाले होते. - तैवानमध्ये २१ सप्टेंबर १९९९ रोजी ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यात २४०० जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे १ लाख जखमी झाले, हजारो इमारती नष्ट झाल्या.

जुन्या इमारतीच कोसळल्या...मी २४ व्या मजल्यावर राहात असल्याने घाबरलो होतो.  मात्र, सोसायटीने तत्काळ अलार्म वाजवून आम्हाला न घाबरण्याचे आवाहन केले. पायऱ्यांनी खाली येण्यास सांगितले. इतक्या मोठ्या रिक्टर स्केलचा भूकंप होऊनही येथे अधिक नुकसान झालेले नाही. जुन्या इमारतींचे नुकसान झाले आहे. राजधानीत तर एकाही इमारतीचे नुकसान झालेले नाही. 

टॅग्स :EarthquakeभूकंपInternationalआंतरराष्ट्रीय