शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

इसिसबरोबर लढाई राहिली बाजूला, इथे अमेरिका आणि रशियाच्याच फायटर विमानांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 15:25 IST

आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. राजकीय कुरघोडीतून अनेकदा अमेरिका आणि रशिया परस्परांना दमबाजीही करत असतात.

ठळक मुद्देअमेरिकेच्या दोन फायटर विमानांनी इसिस विरोधातील जमिनीवरील  कारवाईला मदत करण्याऐवजी रशियन फायटर विमानांचा पाठलाग केला. अमेरिकेच्या एफ-22 स्टेल्थ फायटर जेटने रशियाच्या एसयू-25 विमानाला धोक्याचा इशाराही दिला. 

वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. राजकीय कुरघोडीतून अनेकदा अमेरिका आणि रशिया परस्परांना दमबाजीही करत असतात. गुरुवारी सीरियाच्या आकाशात या दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. सध्या सीरियामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश सक्रिय असून तिथे इसिस विरोधात लढाई लढत आहेत. 

गुरुवारी अमेरिकेच्या दोन फायटर विमानांनी इसिस विरोधातील जमिनीवरील  कारवाईला मदत करण्याऐवजी रशियन फायटर विमानांचा पाठलाग केला. आम्ही सक्रिय असलेल्या भूप्रदेशात रशियन फायटर विमाने घुसल्यामुळे पाठलाग करावा लागला असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या एफ-22 स्टेल्थ फायटर जेटने रशियाच्या एसयू-25 विमानाला धोक्याचा इशाराही दिला. 

ही विमाने इतकी जवळ आली होती कि, एसयू-25 बरोबर हवेतील टक्कर टाळण्यासाठी एफ-22 फायटर जेटच्या वैमानिकाला हवाई कसरतीचे कौशल्य दाखवावे लागले. जवळपास 40 मिनिटे हा संघर्ष सुरु होता. इसिस विरोधात जमिनीवर लढणा-या फौजांना अमेरिकेची एफ-22 रॅप्टर विमाने मदत करत होती. त्याचवेळी हा संघर्ष झाला असे एअर फोर्सच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल डॅमियन पिकआर्ट यांनी सांगितले. 

हवाई कसरतींमधून एफ-22 रॅप्टरच्या वैमानिकाने एसयू-25 ला संघर्ष टाळण्याचे संकेत दिले. अमेरिका आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार रशियन फायटर विमाने युफ्रेटस नदीच्या पूर्वेच्या दिशेला येणार नाहीत आणि अमेरिकेची फायटर विमाने पश्चिमेला जाणार नाहीत. रशियाची विमाने अमेरिकेचे नियंत्रण असलेल्या प्रदेशात दिवसाला सहा ते आठवेळा येतात त्यामुळे हा संघर्ष अधिक भडकू शकतो असे अमेरिकेचे म्हणणे आहे. रशियाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. 

टॅग्स :Americaअमेरिकाrussiaरशिया