शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीरियातील संघर्ष वाढला! आणखी एक शहर बंडखोरांच्या ताब्यात; आता राजधानी दमास्कसकडे आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:40 IST

Syria crisis, Homs City Captured : मिळालेल्या माहितीनुसार, होम्स शहराचा ताबा घेतल्याने बंडखोर सैनिकांना सीरियन किनारपट्टीचा मुख्य रस्ता रोखणे सोपे झाले आहे

Syria crisis, Homs City Captured : सीरियातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी बंडखोरांनी सीरियातील तिसऱ्या शहरावर ताबा मिळवला. होम्स या शहरात बंडखोर पोहोचलेअसून एका अहवालानुसार, बंडखोर गट हयात तहरीर अल शाम (HTS) ने अलेप्पो आणि हमा या दोन मोक्याच्या शहरांवरही कब्जा केला आहे. सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सचे (SOHR) प्रमुख रामी अब्देल रहमान यांनी सांगितले की, रस्तान आणि तालबिसेह ताब्यात घेतल्यानंतर HTS आणि त्यांचा सहकारी गट होम्स शहराच्या बाहेरील भागापासून पाच किलोमीटरवर पोहोचला होता. अखेर त्यांनी होम्सचा ताबा मिळवला असून आता बंडखोर सैनिक देशाची राजधानी असलेल्या दमास्कसच्या दिशेने आगेकूच करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, होम्स शहराचा ताबा घेतल्याने बंडखोर सैनिकांना सीरियन किनारपट्टीचा मुख्य रस्ता रोखणे सोपे झाले आहे. सिरियन किनारपट्टीचा मुख्य रस्ता हा राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांच्या अलावाइट गटाचा गड मानला जातो. सीरियाचे होम्स शहर हमाच्या दक्षिणेस आहे. सुमारे १० दिवसांत, HTS आणि सहयोगी सैनिकांनी सीरियाची प्रमुख सामरिक शहरे मानली जाणारी अलेप्पो आणि हमा ही शहरे ताब्यात घेतली. दुसरीकडे बशर सरकारला वाचवण्यासाठी रशियन सैन्य मैदानात उतरले आहे. रशियन सेंटरचे उपप्रमुख ओलेग इग्नासिक यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत रशियन आणि सीरियन हवाई दलांनी संयुक्तपणे मिलिशियाच्या तळांवर केलेल्या हल्ल्यात किमान ३०० बंडखोर ठार झाले आहेत.

अल अरेबिया न्यूजनुसार, रशियन सैन्याने हमा आणि होम्स शहरांना जोडणाऱ्या अल-रस्तान पुलावर मोठा रॉकेट हल्ला केला आहे. SOHR ने देखील हा पूल नष्ट झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच, सीरिया सीमेवरही हिजबुल्लाहचेच हल्ले सुरु आहेत. दोन वरिष्ठ लेबनीज सुरक्षा सूत्रांनी वृत्तसंस्थे रॉयटर्सला सांगितले की, हेजबुल्लाहने सरकारविरोधी लढवय्यांना होम्सचे मोक्याचे शहर काबीज करण्यापासून रोखण्यासाठी रात्रभर लेबनॉनमधून काही सैनिकांना सीरियात तैनात केले आहे.

टॅग्स :Syriaसीरिया